चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! १० रुपयांच्या बीटचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा राहील कायमच चमकदार
धावपळीच्या जीवनशैली, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेकल गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो, तसाच परिणाम त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीन बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध क्रीम त्वचेवर लावल्या जातात. वाढत्या उन्हामुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढणे, पिंपल्स, फोड, मुरुमांचे डाग इत्यादी असंख्य समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत त्वचेमुळे त्वचा खूप जास्त काळवंडल्यासारखी दिसते. चेहऱ्यावर तेज निघून जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच महागडे क्रीम किंवा लोशन वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी १० रुपयांच्या बीटचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. बीटच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवर ग्लो येईल चेहरा अधिक सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटची साल काढून बीट किसून घ्या. त्यानंतर किसलेल्या बीटचा रस काढून घ्या. बीटच्या रसात कॉफी पावडर मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळा तसेच ठेवा. काहीवेळ तसाच ठेवल्यानंतर हातांना पाणी लावून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढेल.
वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा आणि त्यानंतर ५ मिनिटं हलकासा मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बीटचा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावर गुलाबी चमक येईल आणि त्वचा खूप जास्त ग्लोइंग दिसेल. कोणताही फेसपॅक किंवा फेस मास्क लावल्यानंतर चेहऱ्यावर मॉईश्चराईज लावणे फार गरजेचे आहे. अन्यथा तुमची त्वचा कोरडी पडू शकते.
कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम
बीटच्या वापरामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा तुकतुकीत दिसते. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा डिटॉक्सिफाय करण्यास आणि त्वचेची पोत सुधारण्यास मदत करतात. विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसते. बीटमधील लोह आणि अँटिऑक्सिडंट्स डोळ्यांखालील वाढलेले काळे डाग कमी होऊन चेहऱ्यावरील चमक वाढवतात. त्वचा आतून शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी बीटचा वापर करावा.






