(फोटो सौजन्य: Pinterest)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाइन्स वीकची आता सुरुवात झाली आहे. या व्हॅलेंटाइन्स वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. प्रेमाच्या या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. हा दिवस अशा लोकांसाठी खास मानला जातो ज्यांना त्यांच्या क्रशला त्यांच्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रेम व्यक्त करण्याचा हा खास दिवस आहे. या दिवशी, प्रेमी त्यांच्या जोडीदारांना लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी प्रपोज करतात, जे त्यांच्या नात्यात नवीन सुरुवात घेऊन येते.
प्रपोज डे हा तुमचे प्रेम मोकळेपणाने व्यक्त करण्याची एक खास संधी घेऊन येत असते. ज्यांना त्यांच्या नात्याला नवीन नाव द्यायचे आहे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मात्र, प्रेमाच्या या दिवसाची सुरुवात कधी आणि कुठून झाली ते अनेकांना आजवर ठाऊक नाही. या दिवसाचा इतिहास फार रंजक असून आज या लेखातून आपण तो सविस्तर जाणून घेणार आहोत.
Valentine Day 2025 : रोज डे कसा सुरू झाला, त्याची पारंपारिक मुळे आणि काळानुसार बदललेली परंपरा
प्रोपोज डेचा इतिहास?
प्रपोज डेचा इतिहास थेट व्हॅलेंटाईन वीकशी जोडलेला आहे, जो प्रेम आणि रोमान्स साजरा करण्यासाठी तयार करण्यात आला होता. 18व्या आणि 19व्या शतकात युरोप आणि अमेरिकेत पुरुषांनी औपचारिकपणे अंगठी घालून लग्नाचा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. असे मानले जाते की 20 व्या शतकाच्या शेवटी व्हॅलेंटाईन वीकची लोकप्रियता वाढल्याने प्रपोज डेकडेही विशेष लक्ष दिले जाऊ लागले. पाश्चात्य संस्कृतीत, प्राचीन काळी पुरुष गुडघे टेकून आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करायचे. मात्र, ही परंपरा आजही दिसून येते, ज्यामुळे या जोडप्यामधील रोमान्स वाढतो. भारतातही व्हॅलेंटाईन वीकसोबत प्रपोज डेचा ट्रेंड गेल्या काही दशकांमध्ये खूप वाढला आहे.
प्रपोज डेचा इतिहास अधिकृतपणे कुठे स्पष्ट केलेला नसला तरी यासंबंधीच्या काही कथा फार प्रचलित आहेत. असे मानले जाते की 1477 मध्ये, ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने मेरी ऑफ बरगंडी हिला डायमंड रिंगसह प्रोपोज केले.1816 मध्ये, प्रिन्सेस शार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केल्याच्या खूप चर्चा आहेत. यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डेबद्दल अशा अनेक कथा प्रचलित आहेत.
Rose Day 2025: रोज डेच्या दिवशी कोणता गुलाब कोणाला द्यावा? आधीच जाणून घ्या, नाहीतर गैरसमज होतील
प्रपोस डेचे महत्त्व
वर्षातून एकदा येणार हा दिवस लोकंना आपल्या मनातील भावना, प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. जर एखाद्याला कोणती व्यक्ती फार काळापासून आवडत असेल पण त्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना कशा पोहचवायच्या हे त्याला समजत नसेल तर हा दिवस अशा लोकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देतो. प्रपोज डे अनेक नवीन नातेसंबंधांची सुरुवात दर्शवितो, जिथे दोन लोक त्यांचे प्रेम मोकळेपणाने स्वीकारतात. तुम्ही आधीच रिलेशनशिपमध्ये असलात तरीही हा दिवस तुम्हाला तुमचे नाते आणखी मजबूत करण्याची संधी देतो. हा दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी तयार करण्यात आला आहे जेणेकरून लोक त्यांच्या मनातील भावना शेअर करू शकतील.