सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. यात लट्ठपणा हीदेखील एक विशेष समस्या आहे. दिवसेंदिवस बाहेरचे फास्ट फूड खाल्ल्याने अनेकजण लट्ठपणाने ग्रासलेले आहेत. एकदा आपले वजन वाढले की, हे वजन पुन्हा वजन नियंत्रणात करणे फार कठीण होऊन बसते. अशात तुम्ही अभिनेत्या माधवची ट्रिक फॉलो करू शकता. लोकप्रिय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आर माधवनचा फिटनेस अनेक चाहत्यांना प्रेरित करतो.
वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षीही माधवने आपले वजन नियंत्रणात ठेवले आहे. खराब जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे लोक लठ्ठपणाचे बळी पडत आहेत. माधवने अलीकडेच रॉकेट्री: द नंबी इफेक्ट चित्रपटासाठी आपले वजन वाढवले आहे. मात्र यानंतर अभिनेत्याने अवघ्या 21 दिवसांत आपले वाढलेले वजन आटोक्यात आणले आहे. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत. तसेच अनेकांना त्याने नक्की वजन कमी कारण्यासाठी कोणत्या मंत्रांचा वापर केला, हे जाणून घ्यायचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला माधवने वजन कमी करण्यासाठी फॉलो केलेल्या काही ट्रिक्सविषयी माहिती देणार आहोत.
इंटिमेटिंग फास्टिंग
इंटिमेटिंग फास्टिंग या प्रकारचा वापर करून माधवाने आपले वजन झपाट्याने कमी केले आहे. इंटिमेटिंग फास्टिंग हे एका उपवासासारखे आहे, यात तुम्ही काही ठराविक वेळेमध्येच काही खाऊ शकता. यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत मिळते. मात्र दीर्घकाळ उपवास करू नये. तुमचे अन्न नीट चावून खात जा, यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.
हेदेखील वाचा – केमिकल पद्धतीने केस कलर करणे सोडा आणि अशाप्रकारे घरीच तयार करा नैसरगिक हेअर कलर
रात्रीचे जेवण लवकर करा
रात्रीचे जेवण नेहमी वेळेत आणि लवकर करावे असा सल्ला दिला जातो. माधवाने रात्रीच्या जेवणासाठी 6:45 ची वेळ निवडली होती. रात्रीचे जेवण लवकर खाणे हा अधूनमधून उपवासाचा भाग आहे. रात्री लवकर जेवल्याने आणि सकाळी उपवास केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
शरीर हायड्रेट ठेवा आणि झोपेची काळजी घ्या
वजन कमी करण्यासाठी माधवने भरपूर पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवले. तसेच त्याने रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीन वेळ कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारली. नियमित लावलेल्या या सवयींमुळे आरोग्य सुधारते आणि वजन झपाट्याने कमी होते.
आहारात हिरव्या भाज्यांचा करा समावेश
हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर ठरत असतात. बाजं कमी करण्याच्या प्रवासात माधवने आपल्या आहारात भरपूर हिरव्या भाज्यांचा समावेश केला. झोपण्यापूर्वी स्क्रीन वेळ कमी करून झोपेची गुणवत्ता सुधारली. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही हा उपाय नक्की करून पहा.