गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
Ladki Bahin Yojana News : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली…
शरद पवार यांनी खेळाडू हर्षवर्धन सदगीरला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी १२ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली. या मदतीमुळे त्याच्या प्रशिक्षण व तयारीला मोठी चालना मिळणार आहे.
धाराशिवमध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. ३० महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे मातृ व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली…
जावळी तालुक्यातील महू धरणाची उभारणी सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या धरणासाठी सुमारे 700 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर खरातला आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमले असते.
मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरातील प्लेझंट पार्क येथे लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या तडाख्यात आजूबाजूच्या ३ ते ४ इमारती आल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोलर पॅनल बंद पडल्याने त्या शेतकऱ्याचे शेत जमिनी मधील झाडे सुकू लागली असून महावितरण कंपनी कडे शेतकरी फेऱ्या मारत आहे. मात्र महावितरण कंपनीकडून कोणतेही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शेतकरी…
तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर आणि तिकिटांचा काळाबाजार ही मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने बॉट्स आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे.
कुसुंबी मार्गे थेट कोकणातील खेडला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू असून हे काम करण्यासाठी मेढा ते सह्याद्रीनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम करण्यात आले आहे.
आझमी यांनी दावा केला आहे की, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला असुरक्षित वाटते आणि परिस्थिती इतकी बिघडली आहे की मुस्लिमांसाठी रस्त्यावरून चालणेही एक समस्या बनले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा सोमवारी २३ मार्च रोजी राज्याच्या विधानसभेत जोरदारपणे गाजला असून मागील महिन्यात या प्रकरणी दैनिक नवराष्ट्रने १३ फेब्रुवारी रोजी जोरदार वाचा फोडली होती.
Satara ZP Election : साताऱ्याची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध…
जपानी क्रौंच आणि आफ्रिकन ग्रे पोपटांच्या किलबिलाटाने देशी आणि विदेशी पर्यटकांना राणीबागेकडे आकर्षित केले आहे. मुंबई महापालिकेने पर्यटकांकडून २८.१ कोटी रुपये महसूल मिळवला आहे.
महाराष्ट्रात स्वायत्त महाविद्यालयांची संख्या १९७ वर पोहोचली असून तामिळनाडूनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी आहे. युजीसी आणि नॅकच्या नियमांमुळे स्वायत्ततेचा मार्ग सोपा झाला आहे.