फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांना पाठवा प्रेमळ शुभेच्छा
यंदाच्या वर्षी १५ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आई वडील दोन्ही सुद्धा मुलांच्या उज्वल भविष्यशासाठी सतत काहींना काही करत असतात. वर्षांच्या बाराही महिने कष्ट करून मुलांचे पालन पोषण करतात. वडिलांचा त्याग आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा स्पेशल दिवस असतो. यादिवशी मुलं वडिलांना सुंदर सुंदर भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फादर्स डे निमित्त वडिलांना देण्यासाठी काही मराठमोळ्या आणि प्रेमळ शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुमच्या वडिलांना खूप जास्त आनंद होईल. चला तर जाणून घेऊया फादर्स डे च्या प्रेमळ शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)
Father’s Day 2025: फादर्स डे निमित्त वडिलांना द्या ‘हे’ सुंदर गिफ्ट्स, वडील होतील भावूक
आयुष्याच्या वादळी समुद्रात तुमचे ज्ञान आणि मार्गदर्शन माझे दीपस्तंभ राहिले आहे. मी कायमचे आभारी आहे. फादर्स डेच्या शुभेच्छा!
माझे वडील माझा अभिमान आहेत. मी त्यांना या जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा..
वडील एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसतात. आपण नेहमीच आपल्या वडिलांवर प्रेम आणि आदर केला पाहिजे. फादर्स डेच्या शुभेच्छा.
दिसतो स्वर्ग आपणाला
स्वतः मेल्यावरती…
अन् बापाचा संघर्ष कळतो
स्वतः बाप झाल्यावरती..!!”
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
Happy Fathers Day”
आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे
हॅपी फादर्स डे बाबा..!
बाबा म्हणजे झरा मायेचा
बाबा म्हणजे आधार आयुष्याचा
बाबा म्हणजे धडा मुल्यांचा
बाबा म्हणजे अवतार देवाचा
बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जसा जपतो माळी फुलाला
तसं जपलं तुम्ही मला
फेडू कसे पांग तुमचे कळेना काही
तुमच्याविना आयुष्याला माझ्या अर्थ नाही
बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Father’s Day च्या शुभेच्छा!
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो,
पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
“बाप करुणेचा सागर
बाप डोईवरची झालर.,
बाप सुखाचा नागर
बाप ग्रीष्मातली तहान
बाप देवाहून महान.,
बाप झिजवतो काया
घाले उभाजन्म लेकरांसाठी वाया..”
पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
बाप बाप करता
जन्म जाईल सरून.,
तो असे पर्यंत
काढेल सर्व उणीव भरून..”
हॅपी फादर्स डे २०२५
स्वत: आयुष्यभर झटतो
पण मुलांच्या इच्छा पूर्ण करतो
स्वत: एकवेळ जेवतो
पण मुलांना पोटभर खाऊ घालतो
स्वत: अशिक्षित असतो
पण मुलाच्या शिक्षणासाठी सारी शक्ती लावतो
आई जर संसाराचा कणा असेल तर
कुटुंबाचा पाया हा बाप असतो.
बाबा तुम्ही आजवर घेतलेल्या सर्व कष्टांसाठी तुमचा आजन्म मी ऋणी राहीन!
Father’s Day 2025: फार कष्ट घेण्याची गरज नाही फक्त या गोष्टी करा आणि आपल्या वडिलांचा दिवस बनवा खास
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील
हॅपी फादर्स डे!
बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
मला सावलीत बसवून
स्वतः जळत राहिले
असे एक देवदूत
मी वडिलांच्या रुपात पाहिले
वडिलांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!