काहींना सकाळी उठल्यानंतर डोळे चोळण्याची सवय असते. डोळे चोळल्याशिवाय सकाळचं होत नाही. सकाळी उठल्यानंतर डोळे चोळणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून सगळेच लोक नकळत उठल्यावर डोळे चोळतात. अपुऱ्या झोपेचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. पण डोळे चोळ्यानंतर डोळ्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो झोपेतून उठल्यानंतर डोळे चोळू नये. आज आम्ही तुम्हाला झोपेतून उठल्यावर लगेच डोळे चोळल्यानंतर काय दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत. दिल्लीतील एचबीएएस हॉस्पिटलचे माजी रहिवासी डॉ. इम्रान अहमद यांनी डोळे चोळल्यानंतर कोणत्या समस्या उद्भवतात, यावर सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – iStock)
डोळे चोळल्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर समस्या:
डोळ्यांच्या संसर्गाचा धोका:
अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे चोळण्याची सवय असते. पण असे केल्यास संसर्गाचा धोका वाढतो. अनेकदा आपले हात बॅक्टेरियाने भरलेले असतात. त्यामुळे रात्री झोपेत किंवा सकाळी उठल्यानंतर आपण डोळे चोळतो तेव्हा जीवाणू आणि घाण आपल्या डोळ्यांमध्ये जाते. घाण डोळ्यांमध्ये गेल्यानंतर डोळ्यांच्या बुबुळाच्या भागास संसर्ग होऊ शकतो.
[read_also content=”नखं तुटण्याने नका होऊ उदास, नखांच्या मजबूत वाढीसाठी करा लिंबाच्या रसाचा वापर दिसतील आकर्षक https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-use-lemon-juice-for-nail-growth-544535.html”]
डोळ्यांच्या त्वचेचे नुकसान होते:
सतत डोळे चोळल्याने डोळ्यांच्या खालील त्वचेचे नुकसान होते. डोळ्यांच्या नाजूक त्वचेवर प्रभाव पडतो आणि त्वचा लाल होते. डोळ्यांखाली त्वचा ताणली जाते. डोळ्यांखालची त्वचा हळूहळू कमकुवत होण्यास सुरुवात होते.
डोळ्यांच्या नसांवर परिणाम होतो:
सतत डोळे चोळल्यानंतर डोळ्यांच्या मजसंस्थेवर त्याचा परिणाम दिसून येतो. ही समस्या बराच काळ टिकून राहिल्यानंतर डोळ्यासंबंधित समस्या उद्भवतात. तसेच यामुळे काचबिंदू किंवा डोळ्यांच्या नसा खराब होतात.
[read_also content=”मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/reasons-why-vaginal-smell-increase-during-menstrual-period-and-treatment-544623.html”]
डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते:
सतत डोळे चोळत राहिल्यानंतर त्याचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो. सतत डोळा चोळत राहिल्याने डोळ्यांच्या कॉर्नियावर त्याचा परिणाम दिसून येतो. यामुळे दृष्टी अंधुक आणि डोळ्यासंबंधित इतर समस्या उद्भवतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






