मराठा साम्राज्यासाठी ३ एप्रिल १६८०ची तारीख 'का' ठरली काळरात्र!
इतिहासात सोनेरी अक्षरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.तसेच 3 एप्रिल 2025 रोजीछत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आहे. या दिवशी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मराठा साम्राज्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य केवळ 50 वर्ष अवघे होते. या ५० वर्षांच्या काळात त्यांनी अनेक पराक्रम केले होते. त्यांनी त्यांच्या नावाचा ठसा संपूर्ण जगभरात उमटवला आहे. कमी कालावधीमध्ये त्यांनी मुघलांना महाराष्ट्रातून हद्दपार करत मराठा साम्राज्याची स्थापना केली. मराठा साम्राज्याची स्थापना करताना शिवरायांना लाखो मावळ्यांनी साथ दिली होती. मात्र 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.(फोटो सौजन्य – iStock)
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्या दिवशी शिवरायांनी अतिशय महत्वाचे विधान केले होते. मुघलनविरोध लढा देतानाशिवरायांना अनेक संकटांचा सामना करावा ;लागला होता.त्यांनी मुघलनविरुद्धच्या लढाईमध्ये अनेक किल्ले जिंकले सुद्धा आणि किल्ले हरले सुद्धा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूच्या काही तास आधी कोणते विधान केले आणि ते नेमके काय होते, चला तर जाणून घेऊया.
आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका…..!!
मराठा साम्राज्याचे पिता छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रकृती 3 एप्रिल 1680 रोझी खालावली होती. त्याने काहीसे अस्वस्थ वाटू लागले होते. मात्र त्यांचं दिवशी शिवरायांचे निधन झाले. त्यादिवसापासून सगळीकडे ३ एप्रिल हा दिवस शूर मराठा छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जाऊ लागला.
chattrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? जाणून घ्या त्यांनी नावे
3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रायगडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतरच्या कांलखंडात शिवरायांच्या समाधी बांधण्यात आली. याशिवाय त्यांच्या समाधीवर दगडी रचना बांधण्यात आली आहे.