• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Maharashtra Cabinet Meeting Decision Today 10 February 2026 Purandar Airport Baramati Krida Sankul

पुरंदर विमानतळ ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

Cabinet Meeting Decision :राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 03:58 PM
पुरंदर विमानतळ ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

पुरंदर विमानतळ ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय, अजितदादांनी सांगितलेल्या 3 निर्णयांवर मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Cabinet Meeting Decision News in Marathi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (10 फेब्रुवारी ) राज्य सरकारती मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत सुरवातीला अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्ताव वाचला.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा औपचारिक परिचय करून देऊन स्वागत केले. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी. त्या निधी उभारणीला योग्य ती मान्यता देण्यात आली आहे. या विमानतळासाठी जमीन देण्यास इच्छुक असलेल्या एकूण लोकांपैकी ९६ टक्के लोकांनी त्यांची जमीन देण्यास मान्यता दिली आहे.

तसेच नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंधरा हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज. यातून ५७ अपूर्ण सिंचन प्रकल्प व १९३ पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार. राज्यातील ८ लाख हेक्टर कृषि क्षेत्राला सिंचन सुविधा निर्माण होण्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. (जलसंपदा विभाग)

Nitesh Rane : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले… 

कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार. मौजे विकासवाडी ( ता. करवीर) १२ हेक्टर ७६ आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी. कोल्हापुरच्या क्रिडा विकासाला चालना मिळणार.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना. प्रकल्पाला गती देण्यासाठी, भुसंपादन व अनुषांगिक बाबींसाठी सहा हजार कोटींचे कर्ज. एमआयडीसी, एमएडीसी आणि सिडको यांची सहभागीदारी, त्यांच्याकडे भागीदारीनुसार कर्ज फेडीची जबाबदारी. या कर्जाला शासन मान्यता व हमी देण्यास मान्यता.

राज्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ राबविणार. गावपातळीवर आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर. ग्रामपंचायतीली राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच ते २ कोटी रुपयांचा पुरस्कार. ग्रामपंचायत ते जिल्हापरिषद स्तरापर्यंत पुरस्कार. जीवनशैलीत, आहारात बदल करण्यासाठी प्रोत्साहन, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे अभियानाचे चार स्तंभ. राज्यस्तरापासून उपक्रेंद्र- ग्रामस्तरापर्यंतचे नियोजन. आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत अभियान कालावधी. अभियानाकरिता दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद.

पुणे जिल्ह्यातील रत्नपुरी मळा (ता. इंदापूर) येथील एमआयडीसीला जमीन मिळणार. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन नविन औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीला हस्तांतरीत होणार. उद्योजकांसाठी दिलासा, गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होणार (महसूल विभाग)

मुंबईत मौजे कोलेकल्याण (ता. अंधेरी) येथे महाटेनिस फाऊंडेशनच्या माध्यमातून पायाभूत सुविधा. टेनिस खेळाला प्रोत्साहन, खेळाडुंना सुविधा निर्माण होणार. यासाठी म्हाडाच्या भुखंडांवर माध्यमातून संयुक्त भागीदारी तत्वावर विकास योजना राबविण्यास मंजुरी.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प) प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्राकरीता नियुक्त नव नगर विकास प्राधिकरण” क्षेत्रात तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पासाठी भूसंपादन व भूवाटपाच्या धोरणास मान्यता. तिसरी मुंबईच्या दिशेने वाटचालीस गती मिळणार.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसांच्या रकमेत वाढ. विद्यार्थी, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांना मिळणार वाढीव बक्षीस.

महाराष्ट्र सार्वजनिक – खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण – २०२६ जाहीर. वित्तीय मुल्य २५ कोटीहून अधिक असेल, अशा सार्वजनिक – खासगी भागीदारी प्रकल्पांना मंजूरी देण्याचे अधिकार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीला. नियोजन विभागात यासाठी स्वतंत्र कार्यासन निर्मितीस मान्यता

ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून ई-मेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम २३०- (नोटीस बजाविणेची रित) मध्ये इलेक्ट्रानिक मेलव्दारे नोटीस बजाविण्याच्या नियमात दुरूस्ती.

परभणी जिल्ह्यातील इंद्राणी सहकारी सूतगिरणीला (ता. मानवत) शासन अर्थसहाय्य मिळणार

राज्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या ११ पदांच्या निर्मितीस मान्यता. जिल्ह्यांचे भौगिलिक क्षेत्र, वाढलेली लोकसंख्या व अंतर विचारात घेता विविध सेवा जलद मिळाव्यात यासाठी उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार पद निर्मिती.

नागपूर जिल्ह्यातील मौजा लिंगा (ता. कळमेश्वर) येथे कोल टू केमिकल प्रकल्पासाठी ११७ हेक्टर १९ आर जमीन एमआयडीसीला उपलब्ध करून देणार.

बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी ७५ कोटी १३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता. यातून ८० हजार चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान अशा सुविधा उभारण्यात येणार.

सुधारित धान्य वितरण प्रणालीत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वाहतूक कंत्राटे निश्चितीसाठी एकाच वेळी निविदा प्रक्रीया राबविण्यास मान्यता. यामुळे मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ५ परिमंडळे व ३४ जिल्ह्यांमधील वितरण प्रणाली सक्षम होणार, यात सुसूत्रता येणार

अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडा (ता. मुर्तिजापूर) येथील लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या ६ कोटी ६० लाख रुपयांच्या दुरूस्ती अंदाजपत्रकास मंजुरी. यामुळे २५५ हेक्टरला सिंचन उपलब्ध होणार

महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) अध्यादेशास मंजुरी

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील १०९ (३) (घ) मध्ये सुधारणेस मान्यता.

महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा करण्यास, त्याबाबतच्या अध्यादेशास मान्यता.

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Web Title: Maharashtra cabinet meeting decision today 10 february 2026 purandar airport baramati krida sankul

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Cabinet Meeting
  • Eknath Shinde
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित
1

Nashik News: बाराशे नळधारकांना मनपा बजावणार ‘वॉरंट’, पहिल्या टप्यात दीडशे नळजोडणी खंडित

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती
2

OTM 2026: जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा डंका! मुंबईतील ‘ओटीएम’ प्रदर्शनात राज्याच्या दालनाला पर्यटकांची पसंती

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
3

Karjat News : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका
4

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?

Corruption: जगातील भ्रष्टाचार देशांची यादी जाहीर, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये टॉपमध्ये; भारत कितव्या स्थानी?

Feb 10, 2026 | 06:03 PM
नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

Feb 10, 2026 | 06:00 PM
Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या

Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या

Feb 10, 2026 | 05:49 PM
Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक

Traffic News: राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा; प्रताप सरनाईक

Feb 10, 2026 | 05:45 PM
Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

Feb 10, 2026 | 05:43 PM
अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Feb 10, 2026 | 05:43 PM
Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Political News : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

Feb 10, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM
आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

आकाशात अवतरला ‘देवदूत’; मेडिकल विद्यार्थी आर्यन लोलयेकरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशाचा जीव

Feb 10, 2026 | 03:31 PM
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.