श्लोका मेहता अंबानी लुक (फोटो सौजन्य - Instagram)
फ्लोरल क्रॉप-स्कर्ट
श्लोका मेहता फ्लोरल लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
श्लोका अंबानीने दीर अनंत अंबानी आणि राधिकाच्या मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात फारच स्टायलिश लुक केला होता. सध्याचा ट्रेंड असणारा फ्लोरल लुक तिने यावेळी कॅरी केला होता. श्लोकाने अत्यंत सुंदर क्रॉप टॉप ज्यावर लवेंडर रंगाची फुलं लावण्यात आली होती घातला होता आणि त्याखाली तिने थाई हाय स्लीट स्कर्ट परिधान केला होता.
बहीण दियाने केली स्टाईल
श्लोका अंबानीचा प्री-वेडिंग लुक (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
श्लोकाची ही स्टाईल बहीण दिया मेहता मजेठियाने केली होती आणि तिनेच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर श्लोकाचे हे फोटो पोस्ट केले आहेत. दिया एक फॅशन इन्फ्लुएन्सर असून नेहमीच आपल्या बहिणीसाठी स्टायलिंग करताना दिसते. तिने श्लोकाला एक अत्यंत फॅशनेबल आणि स्टायलिश लुक दिल्याचे दिसले.
डायमंड ईअररिंग्ज आणि ब्रेसलेट
श्लोका मेहताचे दागिने (फोटो सौजन्य – iStock)
श्लोकाने या ऑफव्हाईट आणि लव्हेंडर कॉम्बिनेशनसह हार्ट शेप डायमंड इअररिंग्ज घातले होते आणि त्याशिवाय तिने हातात अत्यंत नाजूक असे डायमंड ब्रेसलेट कॅरी केले होते. जास्त दागिन्यांचा साज न करता एलिगंट लुक तिने कॅरी केला होता, ज्यात ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती.
स्लीक पोनीटेल
श्लोकाची स्लीक पोनीटेल हेअरस्टाईल (फोटो सौजन्य – iStock)
हेअरस्टाईल करताना तिने केसांना मधून भांग पाडत स्लीक पोनीटेल लुक ठेवला होता. तर हायलाईट्स केलेले तिचे ब्राऊन केस या ड्रेससह परफेक्ट दिसत होते. स्लीक पोनीटेल बांधून तिने त्याचा वेव्ही लुक केला होता, जो फ्लोरल ड्रेसच्या ट्रेंडसह परफेक्ट मॅच होताना दिसतोय.
न्यूड मेकअप लुक
श्लोकाचा मेकअप (फोटो सौजन्य – iStock)
श्लोकाने या ट्रेंडी आणि स्टायलिश ड्रेससह न्यूड मेकअप लुक केला होता. आयशॅडो, हायलायटर, काजळ, मस्कारा, आयलॅशेस आणि न्यूड पिंक शेड लिपस्टिकसह तिने हा लुक पूर्ण केलाय. एखाद्या पार्टीसाठी हा लुक परफेक्ट असून तुम्ही श्लोकाकडून फॅशन टिप्स घेत आपला नवा लुक ट्राय करू शकता.