डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीने केळी खावी का? जाणून घ्या ब्लड शुगर लेव्हलवर याचा कसा परिणाम होतो
केळी हे एक असे पदार्थ आहे जो लहानग्यांपासून जेष्ठांपर्यंत सर्वानाच आवडते. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केलीत मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे रोज जिमला जाणाऱ्या व्यक्तींकडून केळीचे रोज सेवन केले जाते. परंतु केळीचे सेवन डायबिटीस असणारी व्यक्ती करू शकते का? हा प्रश्न नेहमी विचारला जातो.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक आजार हे कॉमन होत चालले आहे. यातीलच एक आजार म्हणजे डायबिटीस. हल्ली अनेक जणांमध्ये डायबिटीसची समस्या दिसून येते. हा आजार असणाऱ्या व्यक्तींना आपल्या आवडत्या आहाराशी खूपच जास्त तडजोड करावी लागते.
केळीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, पोषण आणि फायबर असतात ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण त्याच्या गोडपणामुळे, केळी ही डायबिटीसच्या रुग्णांसाठी एक अवघड समस्या बनली आहे. केळीमध्ये असलेल्या साखरेमुळे डायबिटीसच्या रुग्णांनी ते खाऊ नये असे अनेकांचे मत असते, तर काही लोक त्याचे फायदे सांगून डायबिटीससाठी फायदेशीर मानतात. चला तर मग जाणून घेऊया डायबिटीस रुग्ण केळी खाऊ शकतात की नाही.
केळीमध्ये भरपूर फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. फायबर अन्न हळूहळू पचण्यास मदत करते ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक चढ-उतार होण्यास प्रतिबंध होतो.
केळी पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानले जाते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. डायबिटिसच्या रुग्णांमध्ये हाय ब्लड प्रेशर ही एक सामान्य समस्या आहे.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम सारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
केळीमध्ये मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो, याचा अर्थ ते रक्तातील साखर लवकर वाढवू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी केळी मर्यादित प्रमाणातच खावे.
पिकलेल्या केळ्यांमध्ये कच्च्या केळ्यांपेक्षा जास्त साखर असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी कच्ची किंवा हलकी पिवळी केळी निवडावी. डायबिटिसच्या रुग्णांसाठी दिवसातून एक लहान किंवा मध्यम आकाराचे केळे खाणे सुरक्षित मानले जाते. परंतु, हे व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी आणि इतर घटकांवर अवलंबून असू शकते.
डायबिटीस रुग्णही केळी खाऊ शकतात, मात्र यादरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. आपल्या आहारात केळीचा समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले. ते तुम्हाला सांगू शकतात की तुमच्यासाठी किती केळी खाणे सुरक्षित असेल आणि तुम्ही त्याचा आहारात कसा समावेश करू शकता.