हिंन्दू पंचांगातील पवित्र श्रावण महिना २९ जुलैपासून सुरु झाला आहे. श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय समजला जातो. या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्यात ४ सोमवार येणार आहेत. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा (Mahadevachi Pooja) केल्याने भाविकांना अपेक्षित फळ मिळते. आजच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या सगळ्या मनोकामना पुर्ण होऊन तुम्हाला अपेक्षित फळ प्राप्ती होते.भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने विवाहित महिलेला सौभाग्य लाभते आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.