Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिभेला आलेले लाल फोड आणि जखमा बऱ्या करण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, कधीच येणार नाही तोंड

तोड आल्यानंतर जेवताना किंवा पाणी पिताना वेदना आणि जळजळ होऊ लागते. या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तोंड येण्याची समस्या कायमची कमी होऊन जाईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 25, 2025 | 12:40 PM
तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय

तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय

Follow Us
Close
Follow Us:

शरीरात उष्णता वाढल्यानंतर अनेकांना वारंवार तोंड येऊ लागते. तोंड आल्यानंतर कोणताही पदार्थ खाल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यावर तोंडात वेदना होऊ लागतात. जेवताना किंवा बोलताना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. तोंडात आलेले फोड किंवा जखमांकडेयोग्य वेळी लक्ष न दिल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तोंड येण्यामागे अनेक कारण असू शकतात. शरीरात निर्माण झालेली उष्णता, विटामिनची कमतरता, ताणतणाव, तोंडाच्या स्वच्छतेतील अडचणी किंवा अन्नपदार्थांच्या ऍलर्जीमुळे तोंड येण्याची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तोंडात आलेले फोड आणि जखमा बऱ्या करण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तोंड येण्याची समस्या कायमची दूर होईल आणि आराम मिळेल.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय:

तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे:

तुम्हाला जर वारंवार तोंड येत असेल तर दात स्वच्छ करण्यासाठी किंवा जीभ स्वच्छ करण्यासाठी मशेरी किंवा कोलगेटचा वापर न करता मिठाने दात आणि तोंड स्वच्छ करावे. मिठामध्ये असलेले गुणधर्म दात स्वच्छ करून तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. तोंडात येणाऱ्या फोडांपासून बचाव करण्यासाठी जीभ स्वच्छ ठेवणे, दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे, नियमितपणे माउथवॉशचा वापर करणे इत्यादी उपाय करणे आवश्यक आहे. हे उपाय केल्यामुळे तोंडात साचून राहिलेले खराब बॅक्टेरिया कमी होऊन जीभ आणि तोंडातील त्वचा स्वच्छ होईल.

तणाव कमी करणे:

शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव अनेक आजारांचे कारण आहे. मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तणावापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित ध्यान करणे, योगासने इत्यादी गोष्टी कराव्यात. तणाव कमी करण्यासाठी नियमित ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.

आहारात बदल करणे:

निरोगी आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आहारात विटामिन बी 12 , विटामिन सी, आणि आयर्न इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, बदाम, आणि दूध इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

घरगुती उपाय:

सतत तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा. तोंडात आलेले फोड कमी करण्यासाठी तुम्ही मध, हळद, किंवा नारळाचे तेल इत्यादी घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.फोड किंवा जखम झालेल्या ठिकाणी मध लावल्यास तोंडातील जळजळ कमी होऊन आराम मिळेल आणि जखम लवकर भरेल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Simple remedies to get relief from mouth problems mouth ulcer home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

मेकअप न करता चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! चहा कॉफीऐवजी महिनाभर नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक चहाचे सेवन, त्वचा होईल तुकतुकीत
1

मेकअप न करता चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! चहा कॉफीऐवजी महिनाभर नियमित करा ‘या’ आयुर्वेदिक चहाचे सेवन, त्वचा होईल तुकतुकीत

शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत
2

शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत

झाडूसारख्या कोरड्या केसांना मिळेल भरपूर पोषण! १० रुपयांमध्ये घरच्या घरी करा नॅचरल हेअर स्पा, केस होतील मुलायम
3

झाडूसारख्या कोरड्या केसांना मिळेल भरपूर पोषण! १० रुपयांमध्ये घरच्या घरी करा नॅचरल हेअर स्पा, केस होतील मुलायम

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर
4

१० रुपयांच्या मिल्क पावडरने चेहऱ्यावर येईल फेशिअलसारखा चमकदार ग्लो, उन्हामुळे काळवंडलेली त्वचा होईल सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.