
मेकअप न करता चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! चहा कॉफीऐवजी महिनाभर नियमित करा 'या' आयुर्वेदिक चहाचे सेवन, त्वचा होईल तुकतुकीत
सर्वच स्त्रियांना मेकअप करायला खूप जास्त आवडतो. मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावरील सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पण काहीवेळा मेकअप करण्याची जास्त इच्छा होत नाही. अशावेळी महिला पावडर किंवा नॉर्मल मेकअप करून बाहेर पडतात. सुंदर दिसण्यासाठी केलेला मेकअप त्वचेला हानी पोहचू शकतो. वारंवार फाऊंडेशन, वेगवेगळ्या क्रीम, सेटिंग स्प्रे वापरल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम किंवा सुरकुत्या येऊन त्वचा निस्तेज होते. त्यामुळे ग्लोइंग आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सतत मेकअप करण्याऐवजी त्वचेची आतून काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चहा बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा महिनाभर नियमित प्यायल्यास त्वचेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील आणि चेहरा टवटवीत दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : डाळीपासून नाही यंदा बटाट्यापासून झटपट बनवा कुरकरीत मेदुवडे, रेसिपी नोट करा
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. पण त्याऐवजी आयुर्वेदिक चहा प्यायल्यास चेहरा आतून हायड्रेट राहण्यास मदत होते. चेहरा कायमच हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी आयुर्वेदिक चहा पिणे फायद्याचे ठरेल. याशिवाय आलं, पुदिना आणि दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. मधाचे सेवन केल्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि चेहऱ्यावरील ग्लो टिकून राहण्यास मदत होते. सुंदर त्वचेसाठी भरपूर पाणी, पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली जगणे फार आवश्यक आहे.