Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूच्या जवळ नेत असते रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय… मिनी स्ट्रोकचा वाढतोय धोका; एक्सपर्ट्स काय सांगतात ते जाणून घ्या

Mini Stroke : उशीरा झोपल्याने किंवा सततच्या झोपेच्या अभावामुळे मिनी स्ट्रोकचा धोका वाढत असतो. तरुणांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळून येतो. याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 08:15 PM
मृत्यूच्या जवळ नेत असते रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय... मिनी स्ट्रोकचा वाढतोय धोका; एक्सपर्ट्स काय सांगतात ते जाणून घ्या

मृत्यूच्या जवळ नेत असते रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय... मिनी स्ट्रोकचा वाढतोय धोका; एक्सपर्ट्स काय सांगतात ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • रात्री उशिरापर्यंत जागरणाची सवय आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
  • तज्ज्ञांनी तरुणांमध्ये वाढणाऱ्या एका धोकादायक समस्येबाबत इशारा दिला आहे.
  • काही किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
आजकालच्या बिजी लाईफस्टाईलमध्ये लोकांच्या सवयींमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. रात्री उशीरापर्यंत लोकांचे स्मार्टफोन बंद होत नाही आणि झोपण्याऐवजी लोक आपला वेळ स्मार्टफोनवर घालवणं जास्त पसंत करतात. यामुळे परिणामी झोपेच्या वेळेत मोठे बदल होतात. वेळेत न झोपल्याने किंवा उशीरापर्यंत जागे राहिल्याने आपल्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत असतो. मागील काही काळापासून मीनी स्ट्रोकचा धोका वाढला असून तरुणांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले आहे. न्यूरोलॉजिस्ट्स अलर्ट देत सांगितले की, कधीकधी तुमची ही सवय फक्त थकवा घेऊन येत नाही तर मिनी स्ट्रोकच्या धोक्यालाही खुले आव्हान देते.

कोसळणारे धबधबे, धुक्याने वेढलेले डोंगर अन् शांत वातावरण; मान्सूनमध्ये भारतातील ‘या’ हिडन जेम ठिकाणांना नक्की द्या भेट

मिनी स्ट्रोक काय आहे?

मिनी स्ट्रोक ज्याला मेडिकल भाषेत ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक असे म्हटले जाते. हा असा आजार आहे ज्यात मेंदूच्या एका भागाचा रक्तपुरवठा तात्पुरता थांबतो. याची लक्षणे काही मिनिटांत नाहीशी होऊ शकतात पण यांना हलक्यात घेण तुम्हाला पुढे जाऊन महागात पडू शकतं. अमेरिकेतील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या मते, ज्या लोकांना ट्रान्झिएंट इस्केमिकचा त्रास सतावत आहे त्यातील तीनपैकी अंदाजे एका व्यक्तीला नंतर स्ट्रोकचा धोका आहे. अशी निम्मी प्रकरणे एका वर्षाच्या आत समोर आली आहेत.

झोपेमुळे धोका का वाढतो?

तज्ञांच्या मते, झोपेचा अभाव वेगाने न्यूरोलॉजिकल आणि हृदयासंबंधित आजारांचे मूळ कारण बनते. त्यांच्या मते, सतत कमी झोप घेतल्याने शरीरात तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढू लागतात. याचा ब्लड प्रेशरवर परिणाम होतो, दाह वाढतो आणि मेटाबाॅलिजमवरही वाईट परिणाम होतो. या सर्वांमुळेच पुढे जाऊन मिनी स्ट्रोक आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.

चांगली झोप का महत्त्वाची?

एक्सपर्ट सांगतात की, चांगली झोप फक्त शरीराला आराम मिळवून देत नाही तर यामुळे रक्तवाहिन्यांची दुरुस्ती होते, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत आणि सूज देखील कमी होण्यास मदत मिळते. दुसरीकडे, जर सतत झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा आपल्या शरीरातील संपूर्ण सिस्टीमवर वाईट परिणाम होऊ लागतो. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या संशोधनातून असेही दिसून आले आहे की, सततच्या झोपेच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशर, लठ्ठपणा. डायबिटीज आणि हृदयाच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो.

बाथरूममध्ये अंडरगार्मेंट्स सुकवताय? वेळीच सवय बदला नाहीतर आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या दुष्परिणाम

लक्षणे काय आहेत?

मिनी स्ट्रोकची सर्वात मोठी समस्या म्हणजे याची लक्षणे फार किरकोळ असल्याने लोक याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शरीरात थकवा जाणवतो, बोलण्यास अडचण येते, चक्कर येते, दृष्टी धूसर आणि चेहरा एका बाजूला झुकू लागतो. तुम्हालाही तुमच्या शरीरात अशी काही लक्षणे जाणवत असल्यास याकडे दुर्लक्ष करु नका, तर लगेच रुग्णालय गाठा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sleep deprivation can increase mini stroke risk neurologists warn about late night habits symptoms and prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • sleep problems
  • Stroke

संबंधित बातम्या

Chilli Potato Recipe:  संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो
1

Chilli Potato Recipe: संध्याकाळच्या नाश्ताला काहीतरी चटपटीत आणि तिखट खाण्याचं आहे, तर मग आत्ताच करा ‘हे’ असे कुरकुरीत चिली पोटॅटो

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा
2

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा
3

लग्नाच्या पहिल्या वर्षी चुकूनही करु नका ‘या’ चुका, वैवाहिक नातं बिघडून नात्यात येऊ शकतो दुरावा

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
4

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.