सोनाक्षीचा रिसेप्शन लुक (फोटो सौजन्य - योगेन शाह इन्स्टाग्राम)
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने २३ जून रोजी सर्वांसमक्ष नोंदणीकृत पद्धतीने विवाह केला. हिंदू – मुस्लीम धर्मातील हा विवाह केवळ घरच्या जवळच्या व्यक्ती आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सोनाक्षीचा लुक कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर सोनाक्षीने आपल्या आई-वडिलांच्या लग्नातील ४४ वर्षांपूर्वीची आईची साडी नेसून सर्वांचे मन जिंकून घेतले.
तर सोनाक्षी आणि झहीरचा रिसेप्शन लुकदेखील व्हायरल होतोय. लग्न झाल्यानंतर आपल्याकडे लाल रंगाला खूपच महत्त्व आहे आणि सोनाक्षीने याच रंगाला प्राधान्य देत आपला रिसेप्शन लुक ठेवला होता. सोनाक्षीचा हा लुक नक्की कसा होता, जाणून घ्या.
लाल ब्रोकेड साडी
सोनाक्षीचा साडीतील लुक (फोटो सौजन्य – योगेन शाह इन्स्टाग्राम)
सोनाक्षीचे साडी प्रेम तर सर्वांनाच माहीत आहे. सोनाक्षीने आपल्या रिसेप्शनसाठी लग्नानंतर लाल रंगाला प्राधान्य दिले. चांद बुट्टा असणारी लालभडक रंगाची ब्रोकेड साडी सोनाक्षीने नेसली होती. या साडीमध्ये सोनाक्षीचा लुक अत्यंत प्रभावी आणि मनमोहक वाटत होता. पारंपरिकता आणि अभिजात कलात्मकता दर्शविणारी अशी ही साडी सोनाक्षीच्या चेहऱ्यावरून नजर हटू देत नव्हती.
किंमत वाचून व्हाल थक्क!
आम्ही या साडीची किंमत ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न केला आणि याची चाँदबुटा असणाऱ्या या साडीची किंमत साधारणतः 79,800 इतकी दाखविण्यात येत आहे. मात्र सोनाक्षीने लग्नाच्या रिसेप्शनला अत्यंत मनमोहक असा लुक करून नक्कीच सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. कोणत्याही लग्नाच्या रिसेप्शनसाठी असा साडी लुक तुम्हीही करू शकता. Raw Mango च्या या साडीचा लुक कमालीचा स्टायलिश आणि लक्षवेधी आहे.
सोनाक्षीच्या लुकचे डिकोडिंग
सोनाक्षीचा ब्रोकेड साडीतील लुक (फोटो सौजन्य – योगेन शाह इन्स्टाग्राम)
सोनाक्षीने या लाल साडीसह कुंदनचा हिरव्या खड्यांचा नेकलेस आणि मॅचिंग कानातले घातले होते. तर तिच्या हातातील लाल चुडा हा सर्वाधिक लक्ष वेधत होता. केसांना मध्ये भांग पाडत तिने आंबाडा घातला होता तर केसात सुंदर असे गजरे माळले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्न झाल्यानंतर तिने झहीरच्या नावाचे कुंकूही लावले होते. तर कपाळावर ठसठशीत लाल टिकली लावत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय तिने मिनिमल मेकअप ठेवत भारतीय लुक पूर्ण केला.