Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

रसम राईस हा दक्षिण भारताचा एक फेमस आणि पारंपरिक पदार्थ आहे ज्यात चटकेदार रसमला गरमा गरम भातावर टाकून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. मुख्य म्हणजे ही डिश फक्त चवीनेच नाही तर पौष्टिकतेनीही भारलेली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2025 | 09:51 AM
साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

साऊथ अभिनेता राम चरणपासून ते बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे चटकेदार रस्सम; जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत रस्सम हा एक अत्यंत लोकप्रिय आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. भातासोबत खाल्ला जाणारा हा आंबटसर-तिखटसर रस्सा केवळ चवीलाच नाही तर पचनासही उपयुक्त मानला जातो. त्यामध्ये चिंच, टोमॅटो, मिरी, जिरे, हळद, करीपत्ता यांसारखे मसाले व साहित्य वापरले जातात, ज्यामुळे त्याची चव अजूनच खास लागते. गरमागरम भातावर रस्सम ओतून, त्यावर थोडे तूप घालून खाल्ल्यास जेवणाचा आस्वाद दुप्पट होतो.

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा ज्वारीचा इंस्टंट डोसा, वजन कायमच राहील नियंत्रणात

दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये रस्सम रोजच्या जेवणात आवर्जून बनवला जातो. हलका, झटपट आणि पोटाला सुखावणारा हा पदार्थ पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खाल्ला तर शरीराला उबदार ठेवण्यासही मदत होते. अनेक अभिनेत्यांनी आपल्या मुलाखतीत हे स्पष्ट केले आहे की त्यांना रस्सम खायला फार आवडतो. अशात सर्वांच्या आवडीच्या या डिशमध्ये नक्की काय आहे ते तुम्ही एकदा तरी घरी बनवून पाहायलाच हवे. चला तर मग जाणून घेऊया रस्समची एक भन्नाट आणि सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ मोठा चमचा चिंच पाणी (इमली पल्प)
  • १ मोठा टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट (ऐच्छिक)
  • १ टीस्पून मोहरी
  • १/२ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून काळी मिरी पूड
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टीस्पून रस्सम पावडर (बाजारात मिळते / घरी बनवलेली)
  • ७-८ कढीपत्ता पाने
  • कोथिंबीर सजावटीसाठी
  • २ चमचे तूप किंवा तेल
  • मीठ चवीनुसार
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या प्रसादासाठी घरी नक्की बनवा तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम प्रथम चिंच पाण्यात भिजवून त्याचा आंबट रस काढून घ्या.
  • कढईत तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे टाकून तडतडू द्या.
  • त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
  • नंतर चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • त्यात हळद, रस्सम पावडर, काळी मिरी पूड आणि मीठ घालून छान मिसळा.
  • आता त्यात चिंचेचा रस आणि दोन कप पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा.
  • तयार झालेला रस्सम गरमागरम भातावर ओता, वरून थोडे तूप आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

FAQs (संबंधित प्रश्न)

रसम म्हणजे काय?
रसम हा एक दक्षिण भारतीय रस्सा आहे, जो चिंच, टोमॅटो, मसाले वापरून बनवला जातो आणि गरमा गरम भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो.

रसमचे आरोग्याला फायदे काय आहेत?
रसममध्ये असलेले मसाले आणि औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सर्दी, खोकला यांसारख्या आजारांशी लढायला मदत करतात.

Web Title: South indian famous dish rasam recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • easy food recipes
  • south Indian dish
  • tasty food

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.