दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ हवे असतात. तर काहीवेळा नाश्त्यात विकतचे पदार्थ आणून खाल्ले जाते. मेदुवडा, सामोसा, वडापाव यांसारखे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मल्टी विटामिन भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा समावेश करून बनवलेली भेळ चवीला अतिशय सुंदर लागते. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा चांगल्या आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यात मल्टी विटामिन भेळचा समावेश करू शकता. चला तर जाणून घेऊया मल्टी विटामिन भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






