Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? ‘या’ पानांचे नियमित करा सेवन, आजीबाईच्या बटव्यातील जादुई उपाय

बद्धकोष्ठता वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.अशावेळी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ओव्याची पाने कोमट पाण्यासोबत चावून खाल्ल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारेल आणि शरीराला अनेक फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2025 | 08:46 AM
पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? 'या' पानांचे नियमित करा सेवन

पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? 'या' पानांचे नियमित करा सेवन

Follow Us
Follow Us:

दिवसाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण दिवस खूप जास्त कंटाळवाणा आणि खराब जातो. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचशा धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, तिखट आणि तेलकट पदार्थ, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. रोजच्या रोज शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास पोट फुगणे, पोटात गॅस तयार होते, ऍसिडिटी, अपचन, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)

Blood Circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या उपचार

सकाळी उठल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास शरीराला हानी पोहचते आणि संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. याशिवाय अन्ननलिकेमध्ये पित्त जमा होते. अन्ननलिकेमध्ये जमा झालेल्या पित्तामुळे छातीमध्ये जळजळ वाढणे, छातीमध्ये दुखणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी आणि पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी कोणत्या आयुर्वेदिक पानांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पानांच्या सेवनामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहील.

ओव्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे:

आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ओव्याची पाने शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. या पानांमध्ये थाइमॉल नावाचा घटक आढळून येतो. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ओव्याचे सेवन केल्यामुळे केवळ अन्नपदार्थांच नाहीतर संपूर्ण शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरात वाढलेली बद्धकोष्ठता दूर होते.

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ओव्याचे पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ओव्याचे पानांचे पाणी प्यायल्यास आतड्या स्वच्छ होतात. आतड्यांमधील विषारी घटक बाहेर पडून जातील. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यासोबत ओव्याची पाने चावून खावीत. ओव्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला अनेक गुणकारी फायदे होतील.

ओव्याची पाने चावून खाल्ल्यास पोट हलके होते. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या ऍसिडिटी आणि अपचनामुळे पोटात गॅस जमा होतो. पोटात जमा झालेला गॅस बाहेर पडून गेला नाहीतर आतड्यांमध्ये किंवा पोटात तसाच साचून राहतो, ज्यामुळे पोटात दुखणे, पोटात मुरड मारून येणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याची पाने प्रभावी ठरतील. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. याशिवाय ओवा खाल्ल्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात.

त्वचा उजळवण्यापासून ते हाडांना मजबूत करण्यापर्यंत या 2 रुपयांच्या पानांचे सेवन शरीरासाठी जणू वरदान! रिकाम्यापोटी सेवन करा

या पद्धतीने करा ओव्याच्या पानांचे सेवन:

ओव्याचे पाणी तयार करताना टोपात पाणी गरम करून त्यात स्वच्छ धुवून घेतलेली ओव्याची पाने टाकून १० मिनिटं उकळवून घ्या. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. नियमित ओव्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.

FAQs (संबंधित प्रश्न)

बद्धकोष्ठता म्हणजे काय?

बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांची हालचाल होण्यास त्रास होणे, ज्यामुळे शौचास जाण्यात अडचण येते.

बद्धकोष्ठता का होते?

पुरेसा फायबर किंवा पाणी न घेणे, आणि चरबीयुक्त पदार्थ (उदा. चीज, तळलेले अन्न) जास्त खाणे ही काही प्रमुख कारणे आहेत.काही औषधे आणि जीवनसत्त्वे देखील बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरू शकतात.

बद्धकोष्ठता कशी टाळता येईल?

भरपूर फायबर असलेले पदार्थ (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य) खा आणि भरपूर पाणी प्या. नियमित व्यायाम करा आणि शौचालयाच्या चांगल्या सवयी लावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stomach not cleaned properly consume these leaves regularly the magic remedy from grandmas purse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
1

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
2

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
3

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
4

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.