(फोटो सौजन्य: istock)
सर्वांच्या स्वयंपाकघरात आढळला जाणारे हे बहुगुणी पान म्हणजे कढीपत्ता. स्वस्तात मस्त असे हे पान फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. छोटी आणि हिरवीगार कढीपत्त्याची पानं शरीरासाठी एक नैसर्गिक मल्टीविटामिन सारखे काम करते. प्रसिद्ध पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांनी स्पष्ट केले आहे, की दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त तीन कढीपत्ता खाल्ल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. कढीपत्त्यामधील पोषक घटक आपल्या त्वचेला तसेच आरोग्याला अनेक फायदे मिळवून देतात. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही या पानांचे सेवन करु शकता. चला तर मग कढीपत्त्याचे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात ते सविस्तर जाणून घेऊया.
त्वचा चमकदार होते
पोषणतज्ञांच्या मते, कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असते, जे त्वचेला चमक देण्यास मदत करतात. कढीपत्त्याचे सेवन त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करतात. याचे सेवन डोळ्यांसाठीही फायद्याचे ठरते.
रोगप्रतिकाराक शक्ती मजबूत करते
कढीपत्त्याचे सेवन आपली शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यास सर्वाेत्तम उपाय ठरतो. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करतात. हे निरोगी, तरुण त्वचेसाठी योगदान देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
ऊर्जा आणि मेंदूसाठी फायदेशीर
कढीपत्त्यामध्ये आढळणारे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मेटाबाॅलिजम वाढवतात, थकवा कमी करतात आणि मेंदू सक्रिय ठेवण्यास मदत करतात. एकाग्रता आणि मूड सुधारण्यासही याचे सेवन फायद्याचे ठरते.
रक्ताची कमतरता दूर करा
कढपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे एकत्रितपणे शरीराला लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि अशक्तपणा रोखण्यास मदत करतात.
हाडे मजबूत करा
कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास आणि हाडांची घनता वाढण्यास मदत होते. दररोज कढीपत्त्याचे सेवन तुमच्या हाडांना मजबूती देण्यास मदत करेल.
अशाप्रकारे सेवन करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.