Sangali News: सांगलीत आर. आर. आबा स्मृती करंडक २०२६’ निमित्त दोन दिवसीय नाट्य महोत्सव
‘आर्यरुप नाट्यनिर्मिती थिएटर्स’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आबांच्या स्मृतींना कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो अर्जांमधून निवडक २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरांतील नामांकित नाट्यसंस्था तासगावात दाखल होत आहेत. त्यामुळे यंदाचा स्मृती करंडक कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ही दोन दिवसीय नाट्यमेळा सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत साने गुरुजी नाट्यगृह येथे रंगणार आहे. सामाजिक आशय मांडणाऱ्या एकांकिकांपासून ते निखळ मनोरंजन देणाऱ्या प्रयोगांपर्यंत विविधतेचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. आयोजकांच्या मते, कलेवर प्रेम करणाऱ्या आबांच्या स्मृती जपणं आणि नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तासगावकरांनी या नाट्यमहोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.
Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या
लोकनेते आबांच्या नावाने सुरू झालेली ही स्पर्धा सांगली जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा ठरत आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्यासाठी राज्यभरातील युवा कलाकारांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूसाठी आकर्षक बक्षिसे देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सलग दोन दिवस रंगणारा हा नाट्यमहोत्सव तासगावच्या रंगभूमीला नवे सांस्कृतिक आयाम देणार, यात शंका नाही.






