(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
तुम्ही आजवर लग्नात वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स पाहिले असतील. चाट, चायनिज, इटॅलियन पण कधी लग्नात टपरीवरचा गुटखा किंवा बीडी लग्नात वाटताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल तर आता पाहा. नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एक वेटर आपल्या हातात प्लेट घेऊन लग्नात सर्वांसमोर नेताना दिसतो. तो काहीतरी स्टाटर्स लोकांना वाटत असावा असे वाटत असतानाच अचानक कॅमेरा प्लेटकडे झूम केला जातो आणि त्यात बीडी-गुटखा ठेवल्याचे दिसून येते. मुलीने पहिल्यांदाच असा अनोखा स्टार्टर पाहिल्याने ती थक्क झाली आणि तिने हे दृश्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओमध्ये ती सांगते की ती एका लग्नाला गेली होती आणि हे घडताना पाहून तिला आश्चर्य वाटले. ती पुढे म्हणाली, “मला माहित नाही की हे सामान्य आहे की नाही.”
हा व्हिडिओ @ca_vanshika_curates नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नवीन कर पाहिल्यानंतर, मला शंका नाही…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गावात अजूनही हुक्का आणि बिडी वाटले जातात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “10-12 वर्षांपूर्वी मी हे असं एका लग्नाला पाहिलं होत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






