मासिक पाळी आणि नैराश्याचा नक्की काय संबंध?
मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होण्याची समस्या महिलांमध्ये खूप सामान्य आहे. त्याची तीव्रता प्रत्येक स्त्रीमध्ये बदलू शकते. पण अलीकडेच वेदनांच्या तीव्रतेबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे, जो मानसिक आरोग्याच्या त्रासाकडे निर्देश करतो.
नुकतेच एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, नैराश्य हे मासिक पाळीच्या वेदनांचे कारण असू शकते. संशोधकांनी संभाव्य जीन्स ओळखले आहेत जे या समस्येस जोडू शकतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की हा अभ्यास मानसिक आरोग्य आणि प्रजनन समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोनाची आवश्यकता दर्शवितो, याबाबत आपण सखोल माहिती जाणून घेऊया. अभ्यासात नैराश्य, उदासीनता आणि मासिक पाळीचा नक्की काय संबंध आहे यावर भाष्य करण्यात आले आहे, त्याचे विश्लेषण जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त नैराश्य
पुरूषांच्या तुलनेत महिलांना अधिक नैराश्य येत असल्याचे दिसून येत आहे
नैराश्यामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेदनांचा धोका वाढू शकतो, विशेषतः प्रजनन क्रियेच्या वयात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की स्त्रिया पुरुषांपेक्षा दुप्पट नैराश्याने प्रभावित होतात. हा अभ्यास जर्नल ब्रीफिंग्ज इन बायोइन्फर्मेटिक्समध्ये प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये चीन आणि युकेच्या संशोधकांनी या विषयावर माहिती दिली आहे. याचा थेट परिणाम मासिक पाळीवर होत असल्याचे या अभ्यासात सांगितले आहे.
सावध! कमी वयात मुलींना येतेय मासिक पाळी? पालकांनी ‘या’ गोष्टींकडे द्यावे लक्ष
नैराश्य आणि मासिक पाळीचा संबंध
शिआन जिओटोंग-लिव्हरपूल युनिव्हर्सिटी (XJTLU), चीनमधील पीएचडीचे विद्यार्थी, प्रमुख लेखक शुहे लिऊ म्हणाले की, “आमचे निष्कर्ष प्राथमिक पुरावे देतात की उदासीनता अर्थात नैराश्य हे मासिक पाळीच्या वेदना (डिस्मेनोरिया) चे परिणाम नसून त्यासाठी कारणीभूत असू शकते,” दरम्यान त्यांनी पुढे अभ्यासात म्हटले आहे की, “मासिक पाळीच्या वेदनामुळे नैराश्याचा धोका वाढतो असे आम्हाला आढळले नाही” “आम्हाला आढळले आहे की झोपेच्या समस्यांमुळे मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात, त्यामुळे झोपेच्या समस्यांवर उपचार करणे दोन्ही स्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्वाचे असू शकते,” असे यावेळी लिऊ यांनी सांगितले आहे.
मानसिक आरोग्याची तपासणी
यावरील उपाय म्हणजे मानसिक आरोग्याची तपासणी वेळोवेळी करणे
संशोधकांनी असेही सुचवले आहे की ज्या स्त्रियांना मासिक पाळीत तीव्र वेदना होतात त्यांनी मानसिक आरोग्य तपासणी करावी. असा समग्र दृष्टीकोन दोन्ही परिस्थितींवर उपचार करण्यात मदत करू शकतो. तर या गुंतागुंतीच्या संबंधांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या विषयावर अधिक संशोधन आवश्यक आहे असेही या तपासात सांगण्यात आले आहे.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हा’ घरगुती उपाय, वेदनांपासून मिळेल आराम
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.