वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ ठरतील अमृत
पावसाळ्यात कोणत्या आजारांची लागण होते?
साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपाय?
स्वयंपाक घरातील कोणते पदार्थ शरीरासाठी अमृत?
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य काहीसे बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळा ऋतू संपल्यानंतर पावसाळ्याचे आगमन होते आणि वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळतो. सगळीकडे गारवा निर्माण झाल्यानंतर खूप आनंद वाटतो, पण याच दिवसांमध्ये शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची खूप जास्त श्यक्यता असते. व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार आणि हंगामी फ्लूच्या साथींमध्ये अचानक वाढ होते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीराला संसर्गजन्य आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळयात शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच
वातावरणात सतत होणारे बदल, बिघडलेली हवेची गुणवत्ता, हवेचा दर्जा यामध्ये सतत चढ-उतार होत असतात, ज्यामुळे गंभीर आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढून शरीराचे नुकसान करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विकतचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि शरीर कायमच निरोगी ठेवतात. कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात कायमच पौष्टिक पदार्थ खावेत.
Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे
स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ असतात. हळद, तुळशी, आलं, काळीमिरी, धणे, दालचिनी इत्यादी पदार्थांचे एकत्र पाणी तयार करून प्यावे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यात दाहक-विरोधी आणि आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतात. आल्याच्या सेवनामुळे घशात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया सुधारून शरीरातील घाण बाहेर पडून जाते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाळण्यासाठी वेगवेगळ्या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.
Ans: होय. ऋतू बदल, तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रतेतील बदल यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते.
Ans: हळद, आले, लसूण, काळी मिरी, दालचिनी आणि तुळस यांसारखे पदार्थ रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.
Ans: अपुरी झोप, तणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही वारंवार संसर्ग होण्यामागील सामान्य कारणे






