शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का?
तणावपूर्ण आणि चुकीची जीवनशैली जगल्यामुळे महिलांमध्ये आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे छोटे आजार आणखीन गंभीर होण्याची शक्यता असते. महिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीतील वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्या, कुटुंबिक समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. पण हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि अंडाशयासंबंधी समस्या जास्त उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. या समस्या उद्भवल्यानंतर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावात जातात.
चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून आल्या आहेत. याचा मोठा धोका महिलांच्या गर्भाशय आणि अंडाशयाला असते. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्यासंबंधित होणारे आजार सामान्य झाले असून अनेकांमध्ये दिसून आले आहेत.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वयाच्या ९ किंवा १० वर्षात मासिक पाळी येण्यामागे नेमकी काय आहेत कारण? जाणून घ्या सविस्तर
महिलांना गर्भाशयाची समस्या निर्माण झाल्यानंतर काहीवेळ गर्भाशय काढावे लागते. तसेच महिलांची शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढले जाते. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झालेली असते. त्यातील सर्वच महिलांना उद्भवणारा प्रश्न म्हणजे गर्भाशय काढल्यानंतर महिलांमध्ये कोणत्या समस्या जाणवतात का? शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला सामान्य जीवन जगू शकतात का? असे अनेक प्रश्न महिलांना पडतात.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पुजा माधव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रजोनिवृत्तीनंतर गर्भायश काढलं की नाही यावर सर्व समस्या अवलंबून असतात. हिस्टेरेक्टॉमीनंतर ओटीपोटाचे कार्ये बदलण्याची शक्यता असते. पण मासिक पाळी जाण्यापूर्वी गर्भाशय काढले तर स्त्रियांच्या आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तसेच 40 ते 50 वयोगटातील महिलांना गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय
गर्भाशयात झालेल्या फ्रॉयबॉईड, एंडोमेट्रोसिस, पेल्विकमध्ये वेदना किंवा कॅन्सर इत्यादी कारणांमुळे गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. महिलांच्या शरीरात सगळ्यात नाजूक भाग म्हणजे महिलांचे गर्भाशय. हेच गर्भाशय काढून टाकल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर महिलांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पोटात गर्भाशय नसल्यामुळे पेल्विक कार्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.