सध्या प्रचंड कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे सगळेच त्रस्त पाहायला मिळत आहेत. जिथे कुठे थंडावा मिळेल अशी ठिकाणं आणि पदार्थ आता आपण सगळेच शोधतोय. त्यातच सर्वाचं आवडचं पेयं म्हणजेच उसाचा रसही सगळीकडे मिळू लागला आहे. उन्हाळ्यात उसाचा रस पिणं खूप मोलाचं ठरतं. हा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. जाणून घ्या या फायद्यांबाबत,
ऊर्जा मिळते
उसाचा रस पिल्यानं शरीराला खूप ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ही ऊर्जा अनेक तास टिकून राहते. यामुळं तुम्हाला एकदमच ताजंतवानं आणि उत्साही वाटतं.
वजन कमी करण्यात मदत
वजन कमी करण्यातही उसाचा रस खूप फायदेशीर असतो. यात खूप फायबर असतं. या फायबरमुळं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. इतर काही खावं वाटत नाही.
कावीळ दूर होते
काविळीचा आजार दूर करण्यात उसाचा रस खूप फायदेशीर असतो. काविळीचा त्रास जाणवत असेल तर काही दिवस सतत ताज्या उसाचा रस प्या.
मधुमेहीसुद्धा पिऊ शकतात
मधुमेहाचे रोगीसुद्धा उसाचा रस पिऊ शकतात. या रसात आईसोमाल्टोज नावाचं एक तत्व असतं. यात ग्लायसेमिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना उसाच्या रसापासून धोका पोचत नाही.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
उसाचा रस पिल्यानं आपलं शरीर स्वतःला अनेक बॅक्टरियल आणि व्हायरल संसर्गांपासून वाचवू शकतं. सोबतच त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
सर्दी आणि फ्लू होतो दूर
सर्दी आणि फ्लूसारख्या समस्याच बऱ्या होण्यासाठी उसाचा रस पिणं फायद्याचं ठरतं. सोबतच यामुळं टॉन्सिल्सची समस्याही कमी होते. फक्त बर्फाशिवाय हा रस पिला पाहिजे.
नखं चांगली राहतात
तुमची नखं खूप कोरडी असतील आणि सतत तुटत असतील तर तुम्ही ही समस्या दूर करण्यासाठी उसाचा रस पिऊ शकता. काही दिवस सतत तो पिल्यास परिणाम दिसेल.
सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर होईल
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग, पांढरे चट्टे दूर करण्यासाठी उसाचा रस पिला पाहिजे. यात खूप प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतं.