Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Migraine: कडाक्याच्या उन्हात मायग्रेनचा त्रास वाढतोय? ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम

Tips To Control Migraine Headache: जर तुम्हालाही उन्हाळ्यात डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर काही प्रभावी उपाय यावर आराम देतील, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 29, 2026 | 07:44 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मायग्रेनचा त्रास वाढतोय?
  • ‘हे’ प्रभावी उपाय देतील आराम
  • अशी घ्या काळजी
उन्हाळ्यातील कडाक्याच्या उन्हामुळे अनेकांना डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होतो. विशेषतः तापमानात झपाट्याने वाढ झाल्यानंतर मायग्रेनचा असलेल्या लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांच्या मते, उष्ण हवामान, शरीरातील पाण्याची कमतरता, अपुरी झोप आणि अनियमित आहार हे मायग्रेन ट्रिगर होण्यामागील प्रमुख कारणांपैकी आहेत. उष्ण हवामानामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते आणि त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे मायग्रेन असलेल्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, काही प्रभावी उपाय करुन उष्णतेमुळे वाढणारी डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. हे उपाय कोणते, जाणून घ्या.

Vitamin B12: सतत थकवा जाणवतोय? असू शकतं Vitamin B12 च्या कमतरतेचे संकेत; जाणून घ्या लक्षणे

उष्णतेमुळे मायग्रेन का वाढतो?

तापमान वाढल्यावर शरीरात डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढतो. पुरेसे पाणी न पिणे, उन्हात जास्त वेळ राहणे आणि झोपेची कमतरता यामुळे मायग्रेनचा अटॅक ट्रिगर होऊ शकतो. तज्ज्ञांनी सांगितले की, नियमित दिनचर्या बिघडल्यास डोकेदुखी अधिक तीव्र होऊ शकते.

मायग्रेन कंट्रोल करण्यासाठी प्रभावी उपाय

  • वेळेवर नाश्ता करा– सकाळचा नाश्ता टाळल्याने मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
  • पुरेसे पाणी प्या – दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीर हायड्रेट राहिल्यास मायग्रेनचा धोका कमी होतो.
  • नियमित जेवणाची वेळ पाळा– अनियमित आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी बदलते आणि त्यामुळे डोकेदुखी वाढू शकते.
  • झोपेची वेळ – दररोज ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. उशिरापर्यंत जागरण टाळावे आणि झोपेची वेळ नियमित ठेवावी.
  • स्क्रीन टाइम कमी करा – झोपण्याच्या किमान दोन तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर बंद करावा. जास्त स्क्रीन टाइम मायग्रेन वाढवू शकतो.
  • अल्कोहोल आणि धूम्रपान टाळा – अल्कोहोल आणि निकोटीन हे मायग्रेन ट्रिगर करू शकतात.
  • वजन नियंत्रणात ठेवा – जास्त वजनामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
  • उन्हात बाहेर पडताना काळजी घ्या – डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरा आणि थेट उन्हात जास्त वेळ राहणे टाळा.
  • तणाव कमी करा – योगा, मेडिटेशन आणि श्वसनाचे व्यायाम केल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो.
  • डॉक्टरांचा सल्ला घ्या – जर डोकेदुखी अचानक वाढत असेल, उलट्या होत असतील किंवा दृष्टी धूसर होत असेल तर त्वरित न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

मायग्रेनकडे दुर्लक्ष करू नका

तज्ज्ञांच्या मते, सतत होणारी किंवा अचानक बदललेली डोकेदुखी ही गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. त्यामुळे स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य जीवनशैली आणि नियमित सवयींमुळे मायग्रेनचा त्रास मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण

Web Title: Summer heat migraine headache prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • Headache pain
  • Health Care Tips
  • Migraine news
  • summer heat

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.