Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त

Superfood For Women After 35: पस्तीशीनंतर, महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल आणि मेटाबॉलिझमच्या हळूहळू घटामुळे थकवा, अशक्तपणा आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे आहारात काही सुपरफूडचा समावेश केला पाहिजे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 08:54 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयातही राहायचंय निरोगी?
  • महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स
  • आरोग्य राहील तंदुरुस्त
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. विशेषतः ३५ वर्षांनंतर शरीराची कार्यक्षमता, मेटाबॉलिझम आणि हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. कामाचा ताण, चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक महिलांना थकवा, अशक्तपणा आणि आरोग्याच्या विविध समस्या जाणवू लागतात. त्यामुळे या वयानंतर आहारात योग्य पोषक घटकांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार घेतल्यास महिलांचे हाडांचे आरोग्य, त्वचा, केस आणि संपूर्ण शरीर अधिक निरोगी राहण्यास मदत होते.

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय

कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा

तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांनंतर महिलांमध्ये हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दूध, दही, पनीर, तीळ आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. यामुळे हाडं आणि दात मजबूत आणि निरोगी राहण्यास मदत होते.

प्रोटीन शरीरासाठी का महत्त्वाचे?

स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. डाळी, अंडी, सोयाबीन, कडधान्ये आणि ड्रायफ्रूट्स यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. यामुळे शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत मिळू शकते.

व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ महत्वाचे

तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांनंतर महिलांनी व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३युक्त पदार्थांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीमुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते, तर ओमेगा-३ हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. सूर्यप्रकाश, मासे, अक्रोड आणि जवस यांसारखे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आयरन आणि फायबरची कमतरता

अनेक महिलांमध्ये आयरनच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पालक, बीट, डाळिंब आणि खजूर यांसारखे पदार्थ फायदेशीर मानले जातात. तसेच फायबरयुक्त फळे, भाज्या आणि ओट्समुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

ताणतणाव नियंत्रणात ठेवा

वाढत्या वयानुसार मानसिक ताणाचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर अधिक दिसू शकतो. सततचा ताण हार्मोनल बदल, थकवा आणि झोपेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे योग, ध्यान आणि नियमित शारीरिक हालचाल यांचा दिनचर्येत समावेश केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.

या गोष्टी ठेवा लक्षात?

  • जंक फूड आणि जास्त साखर टाळा.
  • शरीराला आवश्यक पुरेसे पाणी प्या.
  • नियमित व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत

Web Title: Superfoods for women after 35 healthy diet nutrition tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या
1

Kidney Health: जेवणातील ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो किडनीच्या आजारांचा धोका, मुतखडा होऊन उद्भवू शकतात गंभीर समस्या

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
2

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
3

Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार
4

Gut Inflammation: आतड्यांना जखम झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल, शौचाच्या रंगातील बदल झाल्यास उद्भवतील गंभीर आजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.