• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Tea Sugar Rice Roti Chicken Oily Food Dangerous For Health

अतिप्रमाणात चहा,साखर,भात,पोळी,चिकन,तेलकट-तुपकट खाताय!!! आताच सावध व्हा, नाहीतर परिणामांना सामोरं जा

कोणत्याही गोष्टीची अति तिथे माती होते असं म्हणतात...तसंच पदार्थांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे कोणतेही पदार्थ खाताना त्यांचं योग्य सेवन योग्य वेळी केलं तर अपाय होत नाही. प्रत्येक पदार्थाचे परिणाम आणि दुष्परिणाम हे असतात..यावरच आजच्या या लेखातून आपण प्रकाशझोत टाकणार आहोत...

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 19, 2023 | 09:06 PM
अतिप्रमाणात चहा,साखर,भात,पोळी,चिकन,तेलकट-तुपकट खाताय!!! आताच सावध व्हा, नाहीतर परिणामांना सामोरं जा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीयांच्या जेवणात साधारणपणे कार्बोहायड्रेट,प्रोटीन आणि विविध पोषण मुल्यांचा समावेश असतो. त्यात कार्बोहायड्रेट आणि तेलकट पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक असतात.यामुळे, ब-याचवेळा वजन नियंत्रणात राहण्याऐवजी वाढत जातं. त्यात आरोग्यावरही विपरीत परिणाम दिसतात. आहारतज्ज्ञ नेहमी पोषक आहार घ्यावा त्यात पोळी,भाजी,भात,वरण,सलाड यांचा समावेश असावा. भात आणि पोळी सर्वाधिक कार्बोहायड्रेट असतात. प्रोटीन हे डाळी आणि चिकन मधून मिळतात. तर, गोड पदार्थातून एनर्जी मिळत असली तरी, त्यातून रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे काही पदार्थांचं सेवन करताना अगदी जपून करावं.

चहा,साखर,तेलकट-तुपकट पदार्थ,पोळी,भात आणि चिकन यांच्या सेवनाचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेऊ

चहा-

सर्व भारतीयांचं हे आवडत पेय…त्यामुळे,प्रत्येकाची सकाळ सुरू होते ती गरामागरम चहाने…चहा न घेतल्यास त्यांना उत्साह वाटतही नाही.तर अशाच लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण अति चहा हा शरीरासाठी घातक असतो.

चहा चे शौकीन आहात…सावधान..! आधी वाचा ही माहिती

जे अति चहा घेतात त्यांच्यासाठी ही अत्यावश्यक माहिती

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील.

चहाचे दुष्परिणाम…. 

  • दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.
  • भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
  •  दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
  • दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
  • टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
  •  भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
  • चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
  • नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
  •  चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

साखर-

साखर ऊर्जेचा जलद स्रोत आहे. मात्र,साखरेच्या अतिसेवनामुळे भविष्यात अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. या विकारांपैकी एक म्हणजे मधुमेह

रोजच्या चहा,कॉफी,सरबत,कोल्ड्रींकसोबत साधारपणे 50 ग्रॅम साखर पोटात जात असते. मात्र, साखर बंद न करता ती कमी करणे कधीही योग्य आणि फायदेशीर ठरते.

साखर आहारातून वर्ज्य करण्याचे फायदे –

  • साखर कमी केल्याने किंवा वर्ज्य केल्याने वजन कमी होण्यास मदत होते
  • जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते
  • पॅकबंद ज्युस,कोल्ड्रींक पित असल्यास डायबेटीस होण्याचा धोका अधिक
  • साखर अतिप्रमाणात खाल्ल्यास वजन वाढते
  • साखरेच सेवन प्रमाणापेक्षा अधिक असल्यास दातावरील इनामेल सर्वात वरचा थर खराब होतो
  • बेकरी प्रोडक्ट खाणे शक्यतो टाळा

भात किंवा राईस-

पोळीपेक्षा भात खाणे बहुतांश भारतीयांना आवडते. काही लोकांना दररोज वरण-भात-तूप खायला आवडतं तर काही जण राजमा-चावलचे चाहते असतात. कोकण तसंच दक्षिण भारतातील कित्येक पाककृतींमध्ये प्रामुख्याने तांदूळ आणि तांदळाच्या पिठाचा समावेश केला जातो. काही लोकांचा तर भाताशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे, जवळपास अशक्यच. पण दररोज भात खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं का? प्रत्येक दिवशी भात खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होतात आणि शरीराला कोणते लाभ मिळतात? हे जाणून घेऊयात….

  • तांदळामध्ये चरबी म्हणजे फॅट्सचे प्रमाण आणि नैसर्गिक स्वरुपातील साखर देखील कमी असते. तांदळाचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन केल्यास शरीरात इन्सुलिनचा स्राव संतुलित प्रमाणात राहण्यास मदत मिळते.
  • तांदळामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. यातील पोषक घटकांमुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

​खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

  • प्रत्येक दिवशी मर्यादित प्रमाणात तांदळाचे सेवन केल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • भात खाल्ल्याने वजन कमी होतं की नाही, याबाबत प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. कारण ही बाब आपल्या चयापचयाच्या क्षमतेवर अवलंबून असते.
  • दरम्यान बर्‍याच रिपोर्ट्समध्ये हे देखील स्पष्ट झालंय की, जास्त प्रमाणात भाताचे सेवन केलं तर चयापचयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
  • दररोज मर्यादित स्वरुपात तांदळाचे सेवन केल्यास शरीराच्या वजनावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत, अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे.
  • दिवसभरात कोणत्याही वेळेत गरमागरम भात तुम्ही खाऊ शकता. पण दुपारच्या वेळेस भाताचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
  • भारतीय पारंपरिक पद्धतीनुसार दुपारच्या वेळेस डाळ-भात आणि भाजी-पोळी खाल्ली जाते. तुम्ही दिवसभरात एक वाटी भात खाल्ल्यास शरीराचे वजन वाढण्याची समस्या निर्माण होणार नाही.
  • तसंच आपल्या आहारातील अन्य खाद्यपदार्थांवरही योग्य लक्ष ठेवून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

भात खाण्याचे तोटे –

  • भातामुळे सुस्त वाटू शकते
  • भातामुळे मधुमेहाचं प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक
  • भाताच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा होऊ शकतो

पोळी किंवा चपाती, रोटी-

भारतीय आहारात पोळी / चपाती हा एक प्रमुख पदार्थ आहे. अनेकांना दिवसातून दोन्ही वेळा जेवणात फक्त चपाती आणि भाजी खायला आवडते. मात्र, काही लोकांसाठी, गव्हाची चपाती खाल्ल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भ्ऊ शकतात. ज्यामुळे आपली दैनंदिन दिनचर्या ढासळू शकते. चला तर जाणून घेऊया आपल्या गव्हाच्या पोळीबद्दल,अर्थातच चपातीबद्दल…

पोळी / चपाती / भाकरी इत्यादींमधील कॅलरिजचे प्रमाण

१ बाजरीची भाकरी– ९७ कॅलरिज
१ नाचणीची भाकरी– ८८ कॅलरिज
१ मक्क्याची रोटी – १५३ कॅलरिज
१ थालिपीठ – १०० कॅलरिज
१ तंदुरी रोटी – ११६ कॅलरिज
१ फुलका – ५७ कॅलरिज
१ रुमाली रोटी – ७८ कॅलरिज
१ ज्वारीची भाकरी– ३० कॅलरिज

या विविध पोळ्यांमधील कॅलरीज पाहून त्यांची निवड करू नका. इतर पोळ्यांच्या तुलनेत गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरिज असतात. सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती २-३ पोळ्यांचा आहारात समावेश करते. मात्र, वजन घटवणार्‍यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण पोळ्यांचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी पोळी कमी करून त्याऐवजी फळं किंवा भाजीचा आहारात समावेश करावा.

चपाती खाल्ल्यानंतर फुगल्यासारखे वाटते?

पोळी जेवणात अधिक असल्याने आपल्याला कधी कधी पोटात जड वाटायला लागते. कारण पोळी पचायला जड असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. ते होताना त्याची काही लक्षणे खालील प्रमाणे सांगता येईल.

  • दमा
  • जडपणा
  • स्नायू कडक होणे
  • अशक्तपणा किवा थकवा
  • पोटदुखी किवा सूज येणे

चिकन खाताय!!! मग वाचा फायदे आणि तोटे-

मांसाहार खाणाऱ्यांमध्ये चिकनची क्रेझ एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की फक्त चिकनचं नाव ऐकूनच त्यांना अनेक पदार्थ दिसू लागतात. पण चिकनची खासियत फक्त त्याच्या चवीत नाहीये तर चिकन खाण्याचे अनेक फायदेही आहेत.

प्रोटीन सप्लाय- चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्यास प्राधान्य दिलं पाहिजे.

वजन कमी करण्यात होते मदत- सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

हाडांची ताकद वाढते-  प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोका कमी होतो.

तणावापासून मुक्ती- चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करतं. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढते- चिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणं जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानलं जातं.
चिकन खाण्याचे तोटे –
  • अतिप्रमाणात चिकन खाल्ल्यास ब्लड प्रेशर होण्याची शक्यता अधिक असते
  • रोजच्या आहारात चिकनचे सेवन केल्यास युरिक ऍसिड वाढते
  • अनेकांना चिकनच्या अतिसेवनामुळे काहींना लठ्ठपणा येऊ शकतो

तेलकट -तुपकट पदार्थ –

अनेकांना आहारात चविष्ट आणि लज्जतदार पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु ते तेलकट असल्याने अनेकदा त्याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. 

ज्या लोकांना फास्ट फूड किंवा तेलकट स्नॅक्स खायला आवडतात त्या लोकांना लठ्ठपणासह मधुमेहाचा त्रास होण्याची शक्यता असते. याशिवाय तेलकट पदार्थांचं अधिकाधिक प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं. अन्नपचनासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, अतिसार आणि उलट्या यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

हार्ट अटॅकचा धोका…

तेलकट, तुपकट पदार्थांचं सेवन केल्याने व्यक्तीला हार्ट अटॅकचा झटका येण्याचा धोका वाढतो.

त्वचेचे आजार…

अन्नपदार्थांमध्ये असलेल्या अधिक तेलामुळे व्यक्तीला चेहऱ्याचे आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुम्ही कितीही फुडी असाल तरी बेताने खा….कारण, तुमच्या शरीरा सोसवेल तेवढचं खाल्ले तर विकारांना तुम्ही बळी पडणार नाही.

Web Title: Tea sugar rice roti chicken oily food dangerous for health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2023 | 09:06 PM

Topics:  

  • Protein

संबंधित बातम्या

90% भारतीयांच्या ताटात आहे प्रोटीनची कमतरता, ICMR रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
1

90% भारतीयांच्या ताटात आहे प्रोटीनची कमतरता, ICMR रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

जेवणातील बदलाआधी जाणून घ्या प्रोटीनसंबंधित 5 मुख्य गोष्टी, नाहीतर फायद्याऐवजी होईल नुकसान
2

जेवणातील बदलाआधी जाणून घ्या प्रोटीनसंबंधित 5 मुख्य गोष्टी, नाहीतर फायद्याऐवजी होईल नुकसान

प्रोटीनसाठी दररोज चिकन खाताय? तर सावधान! मृत्यू येतोय जवळ, नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा
3

प्रोटीनसाठी दररोज चिकन खाताय? तर सावधान! मृत्यू येतोय जवळ, नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Environment Special Story: ‘इकोकारी’चा पर्यावरणपूरक प्रवास, वेस्ट पासून बेस्टकडे!

Environment Special Story: ‘इकोकारी’चा पर्यावरणपूरक प्रवास, वेस्ट पासून बेस्टकडे!

‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

‘या’ देशात जगातील सर्वाधिक तेलाचे भंडार; तरीही राष्ट्र दारिद्र्य अन् महागाईने त्रस्त, कारण काय?

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Breaking News: विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Bigg Boss 19: शहबाज बदेशाची धमाकेदार Wildcard Entry, बसीर-फरहानाची केली पोलखोल

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

Hockey Asia Cup 2025: चीनला 7-0 ने भारताने नमवले, धुमधडाक्यात अंतिम फेरी प्रवेश, फायनल दक्षिण कोरियाशी

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

कार खरेदीदारांची मज्जाच मज्जा! GST कपात झाल्यानंतर ‘या’ कंपनीने कारच्या किमतीती केली 96,000 रुपयांची कपात

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता; मराठा समाजाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Parbhani News : परभणीत डीजे मुक्त गणेश विसर्जनाला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Ahilyanagar : नगरच्या मानाच्या श्रीगणेशांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.