Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
Teachers Day Wishesh: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांना अनमोल स्थान आहे. जीवन घडवताना लाभलेली गुरूंची साथ जीवनातील अडथळ्यांवर आणि नव्याने आयुष्यात उभारण्यास फार महत्वाची ठरते. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करतात. त्यामुळे शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. हल्ली सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे मनातील भावना व्यक्त करून तुम्ही शिक्षकांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून आनंद व्यक्त करू शकता. आईवडिलांप्रमाणे आयुष्य घडवण्यासाठी शिक्षक सुद्धा फार महत्वाचे असतात. याशिवाय ५ सप्टेंबरला देशभरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केली जाते. शिक्षकांचे अमूल्य योगदान, मार्गदर्शन आणि प्रेरणेबद्दल कृतज्ञता व्यक्त हा दिवस साजरा केला जातो.(फोटो सौजन्य – istock)
Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
माझ्या जीवनाची खरी दिशा,
दाखवली तुम्हीच माझ्या पालकांनो.
तुमच्याशिवाय आयुष्य म्हणजे निराशा,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्हीच माझे पहिले आणि खरे गुरु,
तुमच्यामुळेच मिळाले जीवनाला स्वरूप.
तुमचे उपकार कधीच विसरणार नाही,
आई-वडिलांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा!
ज्ञान आणि संस्कारांचा ठेवा,
तुमच्याकडूनच आम्हाला मिळाला.
आई-वडिलांनो, तुम्हीच आमचे खरे देव,
शिक्षक दिनानिमित्त तुमच्या चरणी नमन!
आई तू मायेचा महासागर,
वडील तू ज्ञानाचा डोंगर.
तुमच्याशिवाय जीवन शून्य आहे,
तुम्हा दोघांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,
आम्ही चालवू हा पुढे वारसा!
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
शिकवता शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचे
सामर्थ्य देणाऱ्या लाडक्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासारखा शिक्षक मिळणे हे आशीर्वादापेक्षा कमी नाही
हॅप्पी टीचर्स डे!
आदरणीय शिक्षक,
तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही
जीवनाच्या अनंत वाटा ओलांडत आहोत
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात नेणाऱ्या
सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञान, संस्कार आणि शिस्त यांची
शिकवण देऊन आमचे आयुष्य समृद्ध करणाऱ्या
सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अज्ञानाचा अंधार दूर करून
ज्ञानातून प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या
माझ्या सर्व गुरूंना मानाचा मुजरा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
केवळ पुस्तकी ज्ञान न देता
जगण्याची खरी कला शिकवणाऱ्या
माझ्या लाडक्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
जन्म दिला तुम्ही, जीवन शिकवले,
प्रत्येक पावलावर आम्हाला साथ दिली.
आई-वडील आणि पहिले गुरु तुम्हीच,
तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई तू माझी पहिली शिक्षिका,
वडिलांनी दिले ज्ञानाचे मोती.
तुमच्यामुळेच घडले जीवन हे,
तुम्हा दोघांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
लहानपणी हात धरून शिकवले,
मोठेपणी आयुष्याचे धडे दिले.
तुमचे ऋण कधीच फेडता येणार नाही,
माझ्या प्रिय गुरु आई-वडिलांना वंदन!
ज्ञान, संस्कार आणि प्रेम तुम्ही दिले,
प्रत्येक अडचणीतून बाहेर काढले.
तुमच्या मार्गदर्शनामुळे जीवन यशस्वी झाले,
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हीच माझे खरे मार्गदर्शक,
तुम्हीच माझे आदर्श गुरु.
तुमच्याशिवाय आयुष्य अपूर्ण असते,
आई-वडिलांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
आई-वडील म्हणजे ज्ञानाचा सागर,
त्यांच्या मार्गदर्शनाने मिळतो यशाचा डोंगर.
आयुष्यभर सोबत राहून शिकवणारे,
तुम्हा दोघांना शिक्षक दिनाचे अभिवादन!
पहिला शब्द तुम्ही शिकवलात,
चालायलाही तुम्हीच शिकवलात.
आज जे काही आहे ते तुमच्यामुळे,
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आईच्या कुशीत प्रेम शिकलो,
वडिलांच्या सहवासात धैर्य शिकलो.
जीवन जगण्याचे धडे गिरवलो,
माझ्या प्रथम गुरुंना प्रणाम!






