• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These Are The Things To Complete The Concept In The New Year

नवीन वर्षात केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 31, 2022 | 10:24 AM
नवीन वर्षात केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज २०२२ वर्षातील शेवटचा दिवस आहे. अशावेळी आपण जीवनाला अधिक चांगले घडवण्यासाठी संकल्प करण्याच्या वळणावर उभे आहोत. म्हणजे एखादी वाईट गोष्ट सोडणे किंवा एखादी चांगली सवय लावून घेणे इत्यादी. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर असे संकल्प जगभरात केले जातात. आपण यानिमित्ताने स्वत:ला काही ना काही वचन देतो. परंतु सामान्यपणे त्याची पूर्तता होत नाही. ८० टक्के लोक तर फेब्रुवारी उजाडेपर्यंत केलेला संकल्प किंवा दिलेले वचन विसरूनही जातात. १२ टक्के लोक पुढील काही महिन्यांत संकल्प सोडून देतात. तर केवळ ८ टक्के लोक त्याची पूर्तता करतात. तेव्हा नवीन वर्षात केलेले संकल्प पूर्ण कसे करावे हे आपण आज जाणून घेऊयात.

इतर लोकांना सहभागी करून घ्या :

वॉरविक विद्यापीठातले तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. जॉन मायकल यांनी संकल्प करण्यात आणि टिकवण्यात सामाजिक घटकांचा असलेल्या प्रभावाचा अभ्यास केला आहे. “आपण केलेले संकल्प इतरांसाठीही महत्त्वाचे आहेत हे लक्षात आलं आणि आपण संकल्प मोडला तर ‘इतरांचं नुकसान होईल’ ही जाणीव जर झाली तर आपण आपले संकल्प नीट पाळतो,” असं मायकल म्हणतात.

म्हणजेच मित्रासमेवत जर तुम्ही एखाद्या क्लासला जाणार असाल तर ते जास्त उपयुक्त ठरू शकतं. जर त्यासाठीची संपूर्ण फी भरलेली असेल तर आपण वेळ आणि पैशाची गुंतवणूक केल्याची भावना असते. त्यामुळे केलेला संकल्प आपण पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करतो. आपण आपल्यापेक्षा इतरांना होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिक धडपडत असतो का, या संकल्पनेवर मयकल सध्या काम करत आहेत.

प्रतिष्ठा :

प्रतिष्ठा ही सुद्धा मोठी प्रेरणा असते. त्यामुळे आपला संकल्प लोकांसमोर जाहीर करणे सुद्धा फायद्याच ठरतं. आपण जर आपला संकल्प पाळला नाही तर लोक आपल्याबद्दल वाईट बोलतील, या भावनेतून आपण संकल्प पूर्ण करण्यासाठी धडपडतो. युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डमधले प्रा. नील नेव्ही म्हणतात, “आपली प्रतिष्ठा अविश्वासू बनू नये अशी आपली इच्छा असते. त्यामुळे आपले संकल्प आणि नियोजन जाहीर करणे फायद्याचे ठरते. पैज लावणे हे सुद्धा काही वेळा फायद्याचे ठरते.” संकल्प सविस्तर स्वरूपाचे असणे सुद्धा आवश्यक आहे, असं ते म्हणतात.

अंमलबजावणीचा उद्देशही असावा लागतो, असही ते सांगतात. म्हणजेच जर तुम्हाला भाषा शिकायची असेल तर प्रवासात असताना भाषेच्या संदर्भातले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. उद्या कोणतं पॉडकास्ट ऐकायचं याचे स्मरण होण्यासाठी तशी चिट्टी तुम्ही तुमच्या कारच्या स्टीअरिंगला लावून ठेऊ शकता, असं ते म्हणतात. निव्वळ संकल्प करण्यापेक्षा त्याची पूर्तता करण्याचे टप्पेसुद्धा ठरवावे लागतात.

दीर्घकालीन नियोजनाचा भाग :

ऑस्ट्रेलियातल्या जेम्स कूक युनिव्हर्सिटीमधले मानसशास्त्रज्ञ अॅड. अॅन स्विनबोर्न म्हणतात, संकल्प सिद्धीपर्यंत नेण्यासाठी तो आपल्या दीर्घकालीन नियोजनाचा भाग होणं आवश्यक असतं. निव्वळ भावनिक आणि अस्पष्ट अशा संकल्पांचा फायदा होत नाही, असं त्या म्हणतात.

समजा तुम्हाल खेळात कधीच रस नसेल आणि तुम्ही जर खेळाडू होण्याचा निर्णय घेतला तर ते पूर्ण होणं कठीण असतं. वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वी जग फिरायचं असा जर तुम्ही निश्चय केला असेल तर पैसे वाचवण्याचा तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. संकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन आवश्यक असतो. सकारात्मक आणि नकारात्मक भावनांची निर्मितीसुद्धा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आवश्यक असते.

Web Title: These are the things to complete the concept in the new year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2022 | 10:24 AM

Topics:  

  • New Year

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.