साबणामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होतेय? त्वचेसाठी साबण निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Soap Selection Tips: साबण ही आपल्या रोजच्या वापरातली वस्तू असली, तरी अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सगळ्या साबणांचे काम सारखेच असते, असे समजून, आपण अनेकदा सुगंध, सवय किंवा उपलब्ध पर्याय पाहून साबणाची निवड करतो. मात्र, त्वचेच्या आणि स्वच्छतेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण तयार केलेले असतात.याविषयी संदीप नाईक, ग्लोबल हेड – आर अँड डी (वैयक्तिक निगा उत्पादने), गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सबद्दल अधिक माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
सगळे साबण जरी त्वचा स्वच्छ करण्यासाठी बनवलेले असले तरी, ते सर्व एकाच उद्देशाने तयार केलेले नसतात.
त्वचेच्या स्वच्छतेसोबतच त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी सौंदर्य साबण विकसित केले जातात. त्यामध्ये अनेकदा ग्लिसरीन, नैसर्गिक तेल आणि शिया बटर यांसारखे घटक असतात, जे त्वचा मऊ आणि आर्द्र ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, गोदरेज नं. 1 हा चंदन, हळद तसेच नैसर्गिक तेलांवर आधारित आहे; चंदन त्याच्या त्वचा मऊ करणाऱ्या, डाग घालवणाऱ्या गुणधर्मांसाठी आणि हळद तिच्या जंतुनाशक, त्वचेला पोषण देणाऱ्या फायद्यांसाठी वापरली जाते—जे त्वचेला मऊ, चमकदार आणि हळुवारपणे स्वच्छ करण्यासाठी बनवलेले आहे.
दुसरीकडे, आरोग्यासाठी योग्य साबण हे स्वच्छतेला प्राथमिक महत्त्व देऊन तयार केलेले असतात. त्यामध्ये जीवाणूनाशक किंवा जंतुनाशक घटक असू शकतात, जे त्वचेवरील जंतू कमी करण्यास आणि शरीराच्या दुर्गंधीवर उपाय करण्यास मदत करतात, ज्यामुळे जेव्हा अधिक स्वच्छतेची आवश्यकता असते तेव्हा ते योग्य ठरतात. सिन्थॉल ओरिजिनल हे याचे एक उत्तम उदाहरण आहे, कारण त्यात जीवाणूनाशक घटक असतात, जे जंतूंपासून संरक्षण करतात आणि दुर्गंधीनाशक म्हणून काम करतात. मुरुमे, डाग आणि पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी डॉक्टर याची शिफारस करतात.
अनेक ग्राहकांना असे वाटते की, एकदा का त्यांना एखादा साबण आवडला, की तो प्रत्येक प्रसंगी वापरता येईल. मात्र, प्रत्यक्षात तुमची जीवनशैली आणि दैनंदिन हालचालींनुसार तुमच्या त्वचेच्या गरजा बदलू शकतात. रोजच्या आंघोळीसाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी ब्युटी सोप उत्तम ठरू शकतो; तर व्यायाम, घराबाहेरील कामे किंवा प्रवासानंतर, तसेच उष्ण आणि दमट हवामानात—जेव्हा घाम जास्त येतो आणि जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तेव्हा हेल्थ सोप वापरणे अधिक फायदेशीर ठरते.
एकाच प्रकारचा साबण प्रत्येकासाठी तितकाच गुणकारी ठरेलच असे नाही. कोरडी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांना ओलावा टिकवून ठेवणाऱ्या साबणांचा फायदा होतो; तर शरीराची दुर्गंधी, मुरुमे किंवा त्वचेच्या किरकोळ समस्या असलेल्यांसाठी स्वच्छतेच्या दिनचर्येचा भाग म्हणून विशिष्ट गुणधर्म असलेले साबण उपयुक्त ठरू शकतात.
प्रत्येक ऋतूत तुमच्या त्वचेची स्थिती सारखी नसते. मग तुमचा साबणही सारखा का असावा?
उन्हाळा किंवा पावसाळ्यात, वाढलेला घाम आणि हवेतील आर्द्रता यामुळे अनेकजण अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता राखणाऱ्या साबणांना पसंती देतात. याउलट, थंडीच्या किंवा कोरड्या हवामानाच्या काळात अशा साबणांची गरज असते जे त्वचेला ओलावा देतात आणि त्वचेचे नैसर्गिक संरक्षक आवरण टिकवून ठेवण्यास मदत करतात.
डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या उपायांनी कमी करा सुरकुत्या; टाळा ‘या’ चुका!
थोडक्यात सांगायचे तर, साबण निवडणे म्हणजे केवळ सर्वात लोकप्रिय ब्रँड किंवा पॅकवरील सर्वात ठळक दावा पाहून निवड करणे नव्हे. तर, आपली त्वचा, आपली जीवनशैली आणि विशिष्ट प्रकारच्या साबणाची निर्मिती नेमक्या कोणत्या उद्देशाने केली गेली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुमची निवड जितकी माहितीपूर्ण असेल, तितकीच तुमचे स्वच्छतेचे दैनंदिन रुटीन त्वचेचे आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल.
Ans: काही साबण त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी करू शकतात. त्यामुळे त्वचा ताणल्यासारखी वाटणे, कोरडेपणा किंवा खडबडीतपणा जाणवू शकतो.
Ans: Fragrance-free, mild आणि skin-friendly cleanser अनेकांना अधिक योग्य ठरू शकतो. नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी करणे चांगले.
Ans: नाही. सुगंधापेक्षा त्वचेचा प्रकार, कोरडेपणा, संवेदनशीलता आणि उत्पादनातील घटक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.






