Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel Advisory : मिडल ईस्टमध्ये तणाव, ट्रॅव्हल करण्याआधी जाणून घ्या कोणत्या देशाची यात्रा आहे सुरक्षित….

मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे काही देशांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, इराण, इस्रायल, सीरिया, इराक, लेबनॉन आणि येमेनचा प्रवास सध्या टाळणे अधिक सुरक्षित आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 15, 2026 | 09:43 AM
Travel Advisory : मिडल ईस्टमध्ये तणाव, ट्रॅव्हल करण्याआधी जाणून घ्या कोणत्या देशाची यात्रा आहे सुरक्षित....

Travel Advisory : मिडल ईस्टमध्ये तणाव, ट्रॅव्हल करण्याआधी जाणून घ्या कोणत्या देशाची यात्रा आहे सुरक्षित....

Follow Us
Follow Us:
  • मिडल ईस्टमधील तणावामुळे काही देशांमध्ये प्रवास करणे सध्या धोकादायक मानले जात आहे.
  • इराण, इस्रायल, सीरिया, इराक, लेबनॉन आणि येमेनचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
  • विमानसेवांवरही परिणाम होऊन काही उड्डाणांचे मार्ग बदलले किंवा रद्द केले गेले आहेत.

मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता विमान सेवांवर आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरही दिसू लागला आहे. जगातील सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाणारे दुबई आणि यूएईसुद्धा या परिस्थितीपासून पूर्णपणे दूर राहू शकलेले नाहीत. काही भागांमध्ये वाढलेल्या तणावामुळे काही महत्त्वाच्या एअरस्पेसमधून जाणाऱ्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी अनेक विमान कंपन्यांनी काही मार्गांवरील सेवा तात्पुरत्या थांबवल्या आहेत किंवा उड्डाणांचे मार्ग बदलले आहेत.

इतिहासप्रेमी आहात? मग महाराष्ट्रातील या ऐतिहासिक वास्तूंना एकदा तरी भेट द्यायलाच हवी

अशा परिस्थितीत परदेश प्रवासाची योजना करणाऱ्या भारतीय नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती स्थिर होईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळणेच योग्य ठरते. जर प्रवास अत्यावश्यक असेल तर सुरक्षा अपडेट्स, सरकारी सूचना आणि स्थानिक परिस्थिती यांची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. सुरक्षिततेला प्राधान्य देऊनच प्रवासाची योजना आखणे हा सध्या सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया, सध्याच्या मिडल ईस्टमधील परिस्थिती लक्षात घेता भारतीय प्रवाशांनी कोणत्या देशांच्या प्रवासापासून दूर राहणे योग्य ठरेल.

सध्या या देशांचा प्रवास टाळणे योग्य

तज्ज्ञ आणि सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार सध्या खालील देशांमध्ये प्रवास करणे टाळणे अधिक सुरक्षित मानले जात आहे.

इराण
इराण आणि त्याच्या आसपासच्या भागात लष्करी हालचाली वाढल्याने सुरक्षा धोका अधिक असल्याचे सांगितले जाते.

इस्रायल
इस्रायलमध्ये वारंवार सुरक्षा अलर्ट आणि मिसाइल हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने काही ठिकाणी सतत तणावपूर्ण वातावरण असते.

लेबनॉन
लेबनॉनमध्येही प्रादेशिक तणावाचा परिणाम दिसून येतो. विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये परिस्थिती संवेदनशील राहते.

सीरिया
सीरिया अनेक वर्षांपासून संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे येथे प्रवास करणे अत्यंत धोकादायक मानले जाते.

इराक
इराकच्या काही भागांमध्ये अजूनही सुरक्षा परिस्थिती स्थिर नाही, त्यामुळे येथे प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो.

येमेन
येमेनमध्ये सुरू असलेल्या दीर्घ संघर्षामुळे परदेशी नागरिकांसाठी येथे प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

चारधाम यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन कुठे आणि कसं कराव? जाणून घ्या संपूर्ण माहिती

उड्डाणांवर काय परिणाम होऊ शकतो?

मिडल ईस्टमधील वाढत्या तणावामुळे अनेक विमान कंपन्यांनी काही मार्ग बदलले आहेत. दिल्ली आणि मुंबईहून दुबई, दोहा यांसारख्या शहरांकडे जाणाऱ्या काही उड्डाणांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. एअरस्पेस टाळण्यासाठी विमान कंपन्या पर्यायी मार्गांचा वापर करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वेळेत तसेच तिकीट दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

परदेश प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला परदेशात प्रवास करणे आवश्यक असेल तर खालील काही महत्त्वाच्या गोष्टींची नक्की काळजी घ्या.

  • प्रवासापूर्वी अपडेट घ्या: विमान कंपनी आणि सरकारकडून जारी केलेल्या सूचना आणि सल्ले तपासा.
  • दूतावासाची माहिती ठेवा: ज्या देशात जाणार आहात त्या ठिकाणच्या भारतीय दूतावासाची संपर्क माहिती जवळ ठेवा.
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या: आपत्कालीन परिस्थितीत ट्रॅव्हल इन्शुरन्स खूप उपयोगी ठरतो.
  • सुरक्षित भागात राहा: संवेदनशील किंवा संघर्षग्रस्त भागांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
  • स्थानिक नियमांचे पालन करा: त्या देशातील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सध्याच्या जागतिक परिस्थितीत सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे परदेश प्रवास करण्यापूर्वी परिस्थितीची अचूक माहिती घेऊनच निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल.

Web Title: Travel advisory israel iran conflict know which country is safe to travel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • safety tips
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
1

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
2

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
3

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.