पावसाळ्यात पाणी स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, त्वचा आणि शरीराचे होणारे नाही गंभीर नुकसान
राज्यासह संपूर्ण देशभरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो आणि उष्णतेपासून सुटका मिळते. पण या दिवसांमध्ये स्वच्छ पाण्यात पावसाचे किंवा गढूळ पाणी मिक्स झाल्यामुळे शरीरसंबंधित आजारांचा धोका वाढतो आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दूषित पाण्याचे सेवन केल्यामुळे जुलाब, उलट्या किंवा साथीच्या आजारांच्या लागण होते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. पावसाचे किंवा दूषित पाणी थेट पोटात गेल्यामुळे पचनाच्या समस्या वाढू लागतात तर काहीवेळा पोटात तीव्र वेदना होऊन आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
पावसाळ्यात पाणी गरम करून प्यायले जाते. तर अनेक घरांमध्ये अजूनही तुरटी किंवा फिटकरीचा वापर केला जातो. मागील बऱ्याच वर्षानूपासून तुरटीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. तुरटीचे महत्व अजूनही कमी झालेले नाही. घरगुती कामे, वैयक्तिक स्वच्छता आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आज आम्ही तुम्हाला पाणी स्वच्छ करताना तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
फिटकरीचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. विहीर, बोअरवेल किंवा साठवलेल्या पाण्यात माती आणि इतर सूक्ष्म कण मिक्स झाल्यामुळे पाणी गढूळ होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे आजारपण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी पाण्यात फिटकरीचा किंवा तुरटीचा बारीक तुकडा पाण्यावर फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली जाऊन बसतो आणि पाणी स्वच्छ होण्यास मदत होते. फिटकरी पाण्यातील गाळ आणि अशुद्ध कण खाली बसवते, ज्यामुळे जिवाणू, विषाणू किंवा इतर रोगकारक सूक्ष्मजीव पूर्णपणे नष्ट करत नाही. त्यामुळे तुरटी फिरवले पाणी पुन्हा एकदा गरम करून प्यावे. पावसाळ्यात पाणी थेट पिण्याऐवजी गाळून, गरम करूनच प्यावे.
मागील काही वर्षांपासून केवळ स्वच्छतेसाठी नाहीतर चेवरील अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते.याशिवाय जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींनी काखेमध्ये फिटकरी किंवा तुरटी फिरवल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होण्यासोबत सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळते. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. दाढी केल्यानंतर चेहऱ्यावर फिटकरी फिरवण्यास छोट्या जखमा आणि किरकोळ रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
तुरटी किंवा फिटकरीचा वापर केल्यानंतर त्वचेला सूट होईल असे कोणते क्रीम लावावे अन्यथा त्वचा खूप जास्त कोरडी होईल. दुर्गंधी, अस्वस्थता किंवा बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढल्यास तुरटीच्या पाण्याने अंघोळ करावी. यामुळे शरीरात वाढलेली नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासोबतच घाम आणि धुळीमुळे साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.






