केस गळती थांबवण्यासाठी बनवा घरच्या घरी प्रोटीन पावडर
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळती सुरु झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती सगळ्यांचं असते.वातावरणातील बदल, हार्मोनल बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. अनेक महिला केस काळे आणि घनदाट ठेवण्यासाठी वेगवेगळे शॅम्पू किंवा कंडिशनर वापरतात. पण सतत शॅम्पू बदलल्यामुळे केसांची वाढ नीट होत नाही. केसांच्या चमकदार आणि मजबूत वाढीसाठी अनेक महिला प्रोटीन पावडर किंवा बाजारात मिळणाऱ्या पावडर विकत घेतात. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही प्रोटीन पावडर विकत घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज आम्ही तुम्हाला केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही पावडर खाल्ल्याने नेमके आरोग्यावर काय परिणाम होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
केस गळतीच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बिया गुणकारी आहेत. भोपळ्याच्या बियांमध्ये सॅच्युरेडेट आणि अन्सॅच्युरेडेट फॅटी एसिड्स आढळून येतात, ज्यामुळे केसांची वाढ चाली होते. भोपळ्याच्या बियांमुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही.यामुळे केस मजबूत आणि निरोगी होतात. पण या बिया काहींना खायला आवडत नाही. त्यामुळेच भोपळ्याच्या बियांचा वापर करून प्रोटीन पावडर बनवण्याची कृती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर एक कप चहा पिण्याऐवजी ‘हे’ आरोग्यदायी ड्रिंक प्या, आजारांपासून रहाल दूर