सुंदर आणि ग्लोइंग त्वचेसाठी 'या' पद्धतीने करा तुळशीच्या पानांचा वापर
हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. प्रत्येक घरात एकतरी तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीच्या पानांचे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अँटीसेप्टीक आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा पूर्णपणे कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. निस्तेज झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. या दिवसांमध्ये मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा कोरडी दिसू लागते. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर होत नाही.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी मधील सतत फेशिअल करून घेणे, फेसमास्क लावणे, बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम्स लावणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि डाग विरहित त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा वापर कशी पद्धतीने करावा, याबद्दल सांगणार आहोत. तुळशीच्या पानांचा वापर अनेक धर्मिक गोष्टींमध्ये केला जातो. शिवाय या पानांपासून फेस पॅक, उटणं, टोनर, स्क्रबर इत्यादी अनेक गोष्टी तयार केल्या जातात.
तुळशीच्या पानांचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम 10 ते 15 तुळशीची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात दही, मध आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करून झाल्यानंतर तुम्ही हा फेसपॅक फ्रिजमध्ये बंद डब्यात भरून ठेवू शकता. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. या फेसपॅकचा वापर केल्यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तुळशीच्या पानांपासून बनवलेले टोनर त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा मुलायम आणि मऊ ठेवण्यासाठी मदत करतात. टोनर बनवण्यासाठी तुळशीची पाने गरम पाण्यात टाकून काही वेळ चांगली उकळवून घ्या. तयार केलेले टोनर बाटलीमध्ये भरून ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्याआधी नियमित टोनर त्वचेला लावा. यामुळे पिंपल्स, मुरूम, फोड, डाग निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा चमकदार दिसू लागेल.






