सुंदर त्वचेसाठी करून पहा घरगुती उपाय
सर्वच महिलांना आपली त्वचा खूप सुंदर आणि गोरीपान हवी असते. चमकदार आणि डाग विरहित त्वचा मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. शिवाय त्वचा उजळ्वण्यासाठी सोशल मीडियावर सुद्धा अनेक वेगवेगळे उपाय दाखवले जातात. महिला सतत बाजारात मिळणारे महागडे प्रॉडक्ट, घरगुती उपाय, सोशल मीडियावरील उपाय, वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण या सर्व गोष्टींचा वापर केल्यामुळे काही दिवसांपुरती त्वचा सुंदर आणि निरोगी दिसते. मात्र कालांतराने त्वचेवर पुन्हा एकदा पिंपल्स, डाग, पुरळ, वांग इत्यादी त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. मात्र या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेला सूट न होणाऱ्या गोष्टींचा वापर करणे टाळावे.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि कोरियन महिलांप्रमाणे नितळ त्वचा मिळवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. त्वचेसाठी विटामीन ई अतिशय फायदेशीर आहे. विटामिन ई चा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
पूर्वीच्या काळापासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कारण यामध्ये असलेले घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. शिवाय कोरफड जेल नियमित त्वचेला लावल्यास त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. या उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास त्वचा कोरडी होणार नाही शिवाय डार्क स्पॉट्स कमी होण्यास मदत होईल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून गेले नाहीतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे पोट स्वच्छ होईल. मधामध्ये आढळून येणाऱ्या घटकांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. ग्रीन टी तयार करून वाटीमध्ये 1 चमचा मध आणि 2 विटामिन ई कॅप्सूल आणि तांदळाचे पीठ टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. 15 मिनिटं ठेवून चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.