तांदळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे
सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावणे तर कधी पार्लरमध्ये जाणून फेशिअल किंवा केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे काहीकाळ त्वचा सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेतली नाहीतर त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण त्वचेची गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. ज्यामुळे त्वचा खराब होणार नाही आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतूनसुद्धा पोषण द्यावे. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. सुंदर त्वचेसाठी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि सुंदर होईल. हल्ली महिला आणि मुलींना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. अशी त्वचा मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करायचा, याबद्दल सांगणार आहोत. तांदळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया.
रोजच्या आहारात भात खाल्ला जातो. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. जेवणात वापरला जाणारा तांदूळ त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. तांदळामध्ये पोषक तत्व आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते. भात बनवताना तांदळातील पाणी फेकून दिले जाते, पण हेच पाणी फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा त्वचेसाठी वापर करू शकता. अनेकदा डॉक्टरही घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणून तांदळाचे पाणी वापरण्याचा सल्ला देतात.
तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. त्यामुळे सुंदर त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. तांदळाच्या पाण्यात विटामिन बी, विटामिन ई, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स किंवा पुरळ घालवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. शिवाय यामध्ये आढळून येणारे फेरूलिक अॅसिड आणि एलांटोइन सूर्याच्या किरणांपासून त्वचेचा बचाव करतात.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तांदळाच्या पाण्यात आढळून येणारे नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहेत. तांदळाच्या पाण्याने तोंड स्वच्छ केल्यास त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. ज्यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. तांदळाच्या पाण्याचे त्वचेवर कोणतेच गंभीर परिणाम दिसून येत नाहीत. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. शिवाय त्वचेसंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी तांदळाचे पाणी मदत करते.