स्वतःजवळ इतका पैसा असावा की तो कोणत्याही अडचणीशिवाय आयुष्य जगू शकेल, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यामुळे माणसाच्या इच्छा अधिकच वाढतात आणि त्याला पैशासोबत प्रसिद्धीही हवी असते, जी अनेकवेळा मेहनत करूनही मिळत नाही.
पण वास्तुशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने पैसा आणि प्रसिद्धी मिळवता येते. आज आम्ही तुम्हाला वास्तुच्या अशाच १० टिप्स सांगणार आहोत, जे प्रत्येकाने आपल्या जीवनात आवर्जून वाचावे.
वास्तुशास्त्रात पैसा आणि संपत्ती वाढवण्यासाठी अशा काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. त्यांच्या मते घरामध्ये बदल केल्याने धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. त्यामुळे समृद्धी वाढते आणि समाजात मान-सन्मान मिळतो. वास्तूनुसार उत्तर ही कुबेरची दिशा आहे. ही दिशा स्वच्छ ठेवल्याने धनप्राप्ती होते. यासोबत घराच्या पूर्व-उत्तर कोपर्यात इतर देवतांची शक्ती असते. त्याला ईशान्य कोन असेही म्हणतात. या दोन्ही दिशांमध्ये दोष नसल्यास घरात धन येते आणि तेथे राहणाऱ्या लोकांनाही संपत्तीचा लाभ होतो.
वास्तूनुसार या गोष्टी लक्षात ठेवा
१. घराच्या उत्तरेकडील भिंतींचा रंग निळा असावा.
२. पाण्याचे ठिकाण उत्तर दिशेला असावे.
३. पाण्याच्या टाकीत शंख, चांदीचे नाणे किंवा चांदीचे कासव ठेवा.
४. सजावटीच्या वस्तूंमध्ये मत्स्यालय घराच्या उत्तर दिशेला ठेवावे.
५. कुबेराची दिशा असल्याने तिजोरी उत्तर दिशेला ठेवावी.
६. उत्तर दिशेला निळा पिरॅमिड ठेवल्याने धनप्राप्ती होते.
७. उत्तर दिशेला एक मोठी काचेची वाटी ठेवा आणि त्यात चांदीची नाणी ठेवा.
८. गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती पूर्व-उत्तर कोपर्यात ठेवून पूजा करा.
९. घराच्या पूर्व-उत्तर कोपर्यात घाण ठेवू नका.
१०. आवळा किंवा तुळशीचे झाड उत्तर दिशेला लावा.