ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत! ब्राझीलचे अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल; PM मोदींची घेणार भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युरोपमध्ये भारताचा वाढला दबदबा! फ्रान्सनंतर आता ‘या’ देशासोबत केली हाय-टेक तंत्रज्ञान भागीदारी
ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा दिल्लीतील विमानतळावर दाखल झाले असून त्यांचे परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी भव्य स्वागत केले आहे. त्यांच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंध वाढविणे आहे. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार असून यावेळी अनेक महत्वाच्या ठळक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
दरम्यान लुला दा सिल्वा मुंबईत भारत मंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या समिटचा उद्देश एआयच्या माध्यनातून ग्लोबल साउथमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इॅमन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर ब्राझीलच्या अध्यक्षांचा दौरा भारताचा जागतिक मंचावर प्रभाव वाढवत आहे.
VIDEO | Brazilian President Luiz Inácio Lula da Silva lands in Delhi to attend AI Summit.#PTIAtAIImpactSummit #IndiaAIImpactSummit2026 #AIImpactSummit2026 (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/dFIcroN7wk — Press Trust of India (@PTI_News) February 18, 2026
Ans: ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा भारतात एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. तसेच भारताशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावरही चर्चा होणार आहे.
Ans: या भेटी ब्राझीलचे अध्यक्ष व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, उर्जा, कृषी, जैव-इंधवन आणि महत्वाच्या खनिजांवरील सहकार्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार आहेत. तसेच दोन्ही देशांतील व्यापार ५० बिलियन डॉलरुपर्यंत पोहोचवण्यावरही चर्चा होणार आहे.
Ans: भारत-ब्राझील दोन्ही देश ब्रिक्स, जी-२० आणि संयुक्त राष्ट्रा या जागतिक मंचावर एकत्रित कामन करतात. एआय समिटमध्ये दोन्ही देशांचा सहभाग ग्लोबल साऊथसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे ग्लोबल साउथमध्ये तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे.






