वास्तुशास्त्र (Vastu Shastra) घराच्या रचनेविषयी खूप काही सांगतं. रचना योग्य असेल तर घरात नेहमी सकारात्म उर्जा येते. त्यातही घराच्या मुख्य दरवाज्याच्या रचनेवर विशेष भर दिला जातो. मुख्य दार आकर्षक, सुंदर आणि मजबूत तर असलंच पाहिजे, पण त्याचबरोबर ते वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार असलं तर त्यामुळे घरात समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. घराचं मुख्य द्वार सर्व सुख देणारं असतं असं मानलं जातं. हे घराचं मुख्य अंग आहे. जर या दाराची जागा व्यवस्थित, वास्तुशास्त्रानुसार असेल तर अनेक दोषांचं आपोआपच निवारण होतं आणि सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि यश-कीर्ती मिळते असं म्हटलं जातं. याबद्दलची अधिक माहिती ‘झी न्यूज’ने प्रसिद्ध केली आहे.






