अपचन झालं किंवा पोटा संबंधित आजारावर कोणते कोणते घरगूती उपाययोजना आहेत, कोणता कोणता आहार घ्यावा या संबंधित सगळी माहिती आपणास आम्ही देणार आहोत. सध्या धावपळीच्या जीवनात आपण काहीही खाऊन आपली भूक भागवतो, जसे की सकाळी उठून आपल्याला लवकर नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो तिकडे आपल्याला जायला घाई असते त्यामुळे घाई घाईत कुठे चहा सोबत ब्रेड खा तर कुठे फक्त चहा पिऊन जाने.
नंतर ते सकाळच नाश्ता करून कामावर गेले की दुपारी कामातून जर वेळ भेटला तर ठीक नाहीतर जेवण सुद्धा आपले नीट होणार नाही त्यामुळे आपला आहार चांगला होत नाही. आपले दररोज चे वेळापत्रक ठरवले पाहिजे पण जर अचानक कोणत्याही वेळी काय खाल्ले तर आपली तब्बेत बिघडायला जास्त वेळ लागत नाही.
आहाराचे टायमिंग जर आपण योग्य रीतीने केले तर आपल्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. तुम्हाला माहीतच आहे की जर आपण योग्य वेळी योग्य आहार जर घेतला नाही तर आपल्याला लगेच त्रास जाणवायला लागतो जसे की पोट गच्च होणे, मळमळणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, डोळ्यावर झोप येणे, चिडचिड होणे. आत्ताच्या जीवनात आपण कुठेही कोणत्याही प्रकारचे अन्न खातो तसेच वेळच्या वेळी झोप घेत नाही, कामामुळे व्यायाम करायला सुद्धा टाईम भेटत नाही. तसेच आजकाल आपण वेळ नसल्यामुळे बाहेरच जास्त करून खातो ते म्हणजे फास्ट फुड.
त्या फास्ट फुड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य वापरले जातात, नंतर आपले रोजचे जे रुटिंग आहे ते बदलल्याने सुद्धा आपल्याला अपचन होते. आज आपण तुम्हाला अपचन का होते तसेच त्याची कारणे काय नंतर आपल्याला अपचन झाले तर काय करावे व ते जर आपल्याला कायमचे घालवायचे असेल तर त्या वर पर्याय काय हे सर्व सांगणार आहोत.
आपल्या रोजच्या आहारात जर योग्य अन्न खात नसेल जसे की जर तुम्ही सकाळी सहा वाजता उठत असाल तर त्यावेळी तुम्ही एक तास गॅप देऊन नंतर नाश्ता केला पाहिजे, नाश्ता हा नेहमी हलका असावा, ज्यामध्ये जास्त करून फळांचा समावेश असावा नंतर ज्युस असावा. जेवण व नाष्टा या मधील वेळेमध्ये विशिष्ट अंतर असावे. नाष्ट्यामध्ये फस्टफूड नसावेत. उपाशी पोटी जास्त वेळ असू नये. जेवल्यावर लेगच झोपू नये. जेवणाची वेळ चुकली असल्यास थोडेसे तरी खाऊन झोपावे. अवेळी खाणे टाळावे. शेतपेय यासारख्या गोष्टी टाळ्याव्यात. जेवणात पोषक आहाराचा समावेश असावा.