सोलो पॉलीअॅमरी म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)
बदलत्या काळानुसार प्रेम आणि नातेसंबंधांची व्याख्याही हळूहळू बदलत आहे. आता नातेसंबंधांच्या नवीन संकल्पना प्रेमाच्या जुन्या कल्पनांना आव्हान देत आहेत. सोलो पॉलीअॅमरी हा असाच एक डेटिंग ट्रेंड आहे. यामध्ये, ती व्यक्ती अनेक प्रेमसंबंध किंवा लैंगिक संबंधांमध्ये राहते, परंतु कोणाशीही वचनबद्ध नसते. विशेषतः तरुण पिढीमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
कोणतंही प्रेम नाही किंवा कोणतीही बांधिलकी सध्याच्या पिढीला नको असते आणि त्यामुळे नात्यात वेगवेगळे ट्रेंड पहायला आणि अनुभवायला मिळत आहेत. सध्या प्रेम म्हणजे नक्की काय अशी विचारायची वेळ येईपर्यंत सध्याची पिढी गुंतागुंत वाढवत आहे असे दिसून येते. आता काय आहे हा नवा डेटिंग ट्रेंड जाणून घ्या
पर्सनल स्पेसची नवी परिभाषा
आजची पिढी सोलो पॉलीअॅमरीकडे एक प्रकारची वैयक्तिक स्पेस किंवा स्वातंत्र्य म्हणून पाहत आहे. यामध्ये व्यक्ती स्वतःच्या अटी आणि शर्तींवर नात्यात राहते. यामध्ये, एकाच वेळी अनेक लोकांशी संबंध ठेवणे हे फसवणुकीचे लक्षण म्हणून पाहिले जात नाही. प्रेम वा कोणतीही बांधिलकी न जपता अनेकांशी लैंगिंक संबंध ठेवले जातात आणि याकडे पर्सनल स्पेस म्हणून ही नवी पिढी पाहत असलेली दिसून येत आहे.
Ghosting: नात्यात सुरू आहे ‘घोस्टिंग’, जोडीदार नक्की असे का वागतात, काय आहे अर्थ?
लग्न आणि प्रेमापासून दूर
आजच्या पिढीचा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. पूर्वी लोक लग्न आणि प्रेमाला पवित्र मानत असत आणि जीवनातील सुख-दुःखात जोडीदाराची गरज आहे याकडे त्यांचा विश्वास होता. मात्र आता हे सर्व कंटाळवाणेपणा आणि जबाबदारीने भरलेले शब्द बनले आहेत असाच समज नव्या पिढीचा आहे. आजच्या पिढीसाठी, जीवनाचा आनंद घेणे म्हणजे आयुष्यभर एकाच व्यक्तीशी बांधले जाण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेणे अथवा वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये तो आनंद पाहणे असा दिसून येत आहे.
पुरूष करत आहेत जास्त फॉलो
२०२२ च्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की भारतातील ६१% लोकांना बहुपत्नीत्वाच्या संबंधांमध्ये (एकापेक्षा अधिक पत्नी) रस आहे अथवा अनेक मुलांना एकापेक्षा अधिक मुलींशी प्रेमसंबंध ठेवण्यात रस असतो. ही प्रवृत्ती केवळ अविवाहित लोकच नव्हे तर विवाहित लोकदेखील पाळतात जे त्यांच्या लग्नाबाहेर अनेक संबंध ठेवतात. हे करणारे बहुतेक जण हे पुरुष आहेत. महिलांमध्ये ही वृत्ती अधिक दिसून येत नसल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे.
Happy लव्ह लाईफ पाहिजे? हे घ्या सिक्रेट टिप्स, नात्यात राहील फक्त नि फक्त आनंद
सोलो पॉलीअॅमरीचे नुकसान
हा डेटिंग ट्रेंड स्वातंत्र्याची भावना देतो हे खरं आहे. पण त्यात काही मानसिक आणि शारीरिक धोकेदेखील आहेत. अशा नात्यांमधील लोकांना अनेकदा एकटेपणा आणि भावनिक अंतराचा सामना करावा लागतो. ज्यामुळे चिंता किंवा नैराश्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, अनेक भागीदारांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका वाढतो. यामुळे हा ट्रेंड फॉलो न करणं अधिक चांगलं ठरू शकतं