Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oral Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ

Right Time To Change Toothbrush: दररोज वापरला जाणारा टूथब्रश दात आणि हिरड्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी तसेच जंतूंचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य वेळी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून टूथब्रश किती दिवसांनी बदलावा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 08:16 PM
Oral  Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ
Follow Us
Follow Us:
  • अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता?
  • आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक
  • जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ
आपल्या दैनंदिन जीवनात दात स्वच्छ ठेवण्यासाठी आपण दररोज टूथब्रशचा वापर करतो, मात्र तो किती दिवस वापरावा आणि नेमका कधी बदलावा याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. पूर्वी लोक कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरायचे, पण आता जवळजवळ प्रत्येक घरात टूथब्रश वापरला जातो. परंतु, अनेकजण ब्रश खराब होईपर्यंत किंवा पूर्णपणे झिजेपर्यंत त्याचाच वापर करत राहतात. दातांची स्वच्छता, हिरड्यांचे आरोग्य आणि तोंडातील संसर्ग टाळण्यासाठी योग्य वेळी टूथब्रश बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, जुना किंवा खराब झालेला टूथब्रश केवळ दात व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही, तर तो जंतू आणि बॅक्टेरियांचे घरही बनू शकतो. त्यामुळे टूथब्रश बदलण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

प्रत्येक ३ ते ४ महिन्यांनी ब्रश बदला

आरोग्य तज्ञांच्या मते, टूथब्रश दर १२ ते १६ आठवड्यांनी, म्हणजेच अंसाधारणपणे प्रत्येक 3 ते 4 महिन्यांनी टूथब्रश बदलावा. या कालावधीनंतर ब्रशचे ब्रिसल्स झिजतात आणि दातांवरील प्लाक व अन्नकण प्रभावीपणे काढू शकत नाहीत. त्यामुळे दातांची स्वच्छता कमी होते. ब्रश कितीही महागडा किंवा उच्च दर्जाचा असला तरी, काही काळानंतर त्याची दात स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते.

ब्रिसल्स खराब झाल्यावर ब्रश बदला

आपल्या तोंडात लाखो जीवाणू आणि सूक्ष्मजंतू असतात. ब्रश केल्याने हे जीवाणू आणि अन्नाचे कण निघून जातात, पण जसजसा टूथब्रश जुना होतो, तसतसे त्याचे केस कमकुवत होतात आणि ते दात व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाहीत. यामुळे दातांच्या मध्ये घाण साचते, ज्यामुळे जीवाणूंची झपाट्याने वाढ होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढतो. जर टूथब्रशचे ब्रिसल्स बाहेरच्या दिशेने वाकलेले दिसत असतील किंवा ते विस्कळीत झाले असतील, तर ब्रश त्वरित बदलणे आवश्यक आहे. खराब झालेल्या ब्रशमुळे हिरड्यांनाही इजा होऊ शकते.

सॉफ्ट ब्रश वापरा

डॉक्टरांच्या मते, खूप कडक ब्रश वापरल्याने हिरड्यांना इजा होऊ शकते. खूप मऊ ब्रश देखील प्रत्येकासाठी योग्य नसतो. तज्ञ साधारणपणे मऊ केसांचा टूथब्रश वापरण्याचा सल्ला देतात. यामुळे दात पूर्णपणे स्वच्छ होतात आणि हिरड्यांना इजा होत नाही. ब्रश करताना जर तुम्हाला हिरड्यांमध्ये वेदना किंवा जळजळ जाणवत असेल, तर तो ब्रश ताबडतोब बदलला पाहिजे.

आजारानंतर ब्रश बदलणे का महत्त्वाचे?

जर तुम्हाला विषाणूजन्य, फ्लू, घशाचा संसर्ग किंवा इतर कोणताही जिवाणूजन्य संसर्ग झाला असेल, तर बरे झाल्यानंतर तुम्ही तुमचा टूथब्रश बदलला पाहिजे. याव्यतिरिक्त, घरातील कोणत्याही सदस्याला संसर्ग झाला असल्यास, इतरांनीही खबरदारी घेतली पाहिजे. सर्दी, ताप, फ्लू किंवा घशाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर जुन्या ब्रशवर राहिलेले जंतू पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात.

टूथब्रश स्वच्छ ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • ब्रश केल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवा.
  • ब्रश नेहमी उभा ठेवून कोरडा होऊ द्या.
  • बंद डब्यात किंवा सतत ओलसर ठिकाणी ठेवणे टाळा.
  • इतरांच्या टूथब्रशला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Web Title: When to change toothbrush oral hygiene tips dental care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘का’ वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण
2

कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘का’ वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण

Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात
3

Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

उन्हाळ्यात वाढतोय ‘यूटीआय’चा धोका; लघवी रोखुन धरणे, ओल्या स्विमसूटमध्ये जास्त वेळ वावरल्याने उद्भवतो संसर्ग
4

उन्हाळ्यात वाढतोय ‘यूटीआय’चा धोका; लघवी रोखुन धरणे, ओल्या स्विमसूटमध्ये जास्त वेळ वावरल्याने उद्भवतो संसर्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.