थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमध्ये कोरफड जेल लावावे की नाही?
सुंदर आणि गोरीपान त्वचा दिसण्यासाठी महिला आणि पुरुष सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. या ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचा खूप सुंदर आणि चमकदार दिसू लागते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागते. सुंदर त्वचेसाठी त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे फार गरजेचे आहे. यासाठी संतुलित आहार, व्यायाम, भरपूर पाणी पिणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची अधिक काळजी घेतली जाते. कारण वातावरणात गारवा असल्यामुळे त्वचा कोरडी आणि खरखरीत होऊन जाते.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर त्वचा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत राहतात. मात्र तरीसुद्धा त्वचेची गुणवत्ता सुधारली जात नाही. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा चांगली करण्यासाठी अनेक महिला कोरफड जेलचा वापर करतात. कोरफड जेल त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. शिवाय यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर कोरफड जेल वापरावे की नाही? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर वाचा सविस्तर माहिती.
हिवाळ्यामध्ये त्वचेत सतत काहींना काही बदल होत असतात. सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा कोरडी आणि खराब होऊन जाते. शिवाय धूळ, माती आणि प्रदूषणाचा परिमाण सुद्धा त्वचेवर दिसून येतो. अशावेळी त्वचेला मॉइश्चराइज करणे गरजेचे असते. सर्वच महिला आणि पुरुष थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची अधिक काळजी घेतात. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी चेहऱ्याला कोरफड जेल लावले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइम्प्लिमेंटरी आणि एंटी फंगल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता चांगली राहते. तसेच त्वचेसंबंधित इतर समस्यांचा धोका कमी होतो.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला आवश्यक असल्यास कोरफड जेल लावावे, यामुळे त्वचेसंबंधित इतर समस्या कमी होतात. तसेच कोरफड जेल लावताना ते अतिप्रमाणात लावू नये. त्वचेला आवश्यक असेल तेवढेच कोरफड जेल लावावे. जास्त प्रमाणात कोरफड जेल लावल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ किंवा पिंपल्स येऊ शकतात.स्किन प्रॉब्लेम्स असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर कोरफड जेलचा वापर करू नये.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बाजारात मिळणारे केमिकलयुक्त कोरफड जेल लावण्याऐवजी ताजे कोरफड घेऊन त्यातील गर चेहऱ्यावर लावावा. केमिकलयुक्त जेलचा वापर केल्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी कोरफड जेलचा वापर करू नये. यामुळे त्वचा खराब होऊ शकते. कोरफड जेल त्वचेला लावताना ते योग्य आणि सम प्रमाणात लावावे.






