फोटो सौजन्य: iStock
नोकरदार व्यक्तीसाठी पगार येणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तो लगेच खर्च होणे यापेक्षा मोठं दुःख ते काय. आजही महिन्याचा एक तारखेला अनेकांचे खिस्से आपल्याला भरलेले दिसतात. पण जसा जसा महिना संपत जातो तसे पैसे सुद्धा संपत जातो. त्यातही जर तुमच्यावर कर्ज असेल तर तुमचा पगार माहिनाखेरीस संपणे हे सहाजिकच आहे. पण जर तुमच्यावर कुठलेही कर्ज नसेल तरीही तुमचा खिसा रिकामा होत आहे तर ही चिंतेची बाब आहे.
किती तरी वेळा असे घडते की आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा विशेष प्रसंगी खूप खर्च करून बसतो. खर्च करण्याच्या या सवयी अनेकदा आपले बजेट बिघडवतात आणि नंतर पश्चातापाचे कारण बनतात. यामुळेच आपण पैश्याची बचत कशी करावी याबद्दल जाणकार असणे फार गरजेचे आहे. चला आज आपण अशा सोप्या मार्गांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्ही तुमचे जास्तीचे खर्च नियंत्रित करू शकाल.
हे देखील वाचा: फक्त जिना चढून-उतरून वाढू शकते आयुष्य, तब्बल 5 लाख लोकांवर झाला अभ्यास
जुन्या काळातील फॉर्म्युला
आपला प्रत्येक लहान-मोठा खर्च वहीमध्ये लिहून ठेवल्याने तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष ठेवण्यास मदत होते. यात तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट आणि डेबिट कार्ड पावत्या देखील समाविष्ट करा. महिन्याच्या शेवटी, हे सर्व खर्च जोडा आणि त्यांची तुमच्या बजेटशी तुलना करा. यामुळे तुम्ही कुठे जास्त खर्च करत आहात आणि कुठे कमी करू शकता हे तुम्हाला कळण्यास मदत होईल.
अशी होईल भरपाई
तुमच्याकडे जास्त खर्चाची भरपाई करण्याचे दोन मार्ग आहेत. एक, तुमचे खर्च कमी करून बचत करणे आणि दुसरे, तुमचे उत्पन्न वाढवण्याचे अन्य मार्ग शोधणे. जर तुम्ही थोडा जास्त खर्च केला असेल तर तुम्ही ते तुमच्या पुढच्या महिन्याच्या बजेटमध्ये जोडण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर ही रक्कम खूप मोठी असेल तर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय शोधावे लागतील.
आपल्या खर्चांवर लक्ष ठेवा
दर महिन्याला असे काही खर्च होत असतात जे कमी करणे कठीण असते, जसे की भाडे किंवा मुलांची फी. परंतु, तुम्ही तुमच्या गरजेनुसार काही खर्च कमी करू शकता. उदाहरणार्थ, रेस्टॉरंटमध्ये खाण्याऐवजी घरी अन्न शिजवून तुम्ही पैसे वाचवू शकता.
थोडा संयम ठेवा
थोड्या मेहनतीने तुम्ही तुमचे अतिरिक्त खर्च तर पूर्ण करू शकालच शिवाय भविष्यासाठी मजबूत आर्थिक स्थिती निर्माण करू शकाल.