Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle News: ट्रायल रुममध्ये कपडे परफेक्ट, पण घरी येताच लूक बदलतो? जाणून घ्या खरं कारण!

Lifestyle News: ट्रायल रूमचे वातावरणही आपल्या निर्णयावर परिणाम करते. आतमध्ये स्वच्छता, थंड हवा, छान सुगंध आणि शांतता असते. बाहेरच्या गर्दीमधून आत गेल्यावर मनही प्रसन्न होते. अशा वेळी आपण स्वतःकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 21, 2026 | 03:05 PM
Trial Rooms (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Trial Rooms (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Lifestyle News: शॉपिंगला गेल्यावर एक गोष्ट जवळपास प्रत्येकाच्या बाबतीत घडते. दुकानात ट्रायल घेतलेला ड्रेस खूप छान दिसतो, अंगावर मस्त बसतो आणि लगेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला जातो. पण तोच ड्रेस घरी आणून पुन्हा घातला की काहीतरी वेगळंच वाटू लागतं. रंग तितका उठून दिसत नाही, फिटिंगही तसं खास वाटत नाही आणि अनेकदा “हा ड्रेस खरंच मी घेतला का?” असा प्रश्नही पडतो. मग असं नेमकं का होतं?

मोठ्या मॉलमधील ट्रायल रूम अशा पद्धतीने तयार

यामागे कपड्यांपेक्षा दुकानातील वातावरणाचा मोठा वाटा असतो. मोठ्या मॉलमधील ट्रायल रूम अशा पद्धतीने तयार केल्या जातात की ग्राहकांना कपडे अधिक आकर्षक दिसावेत. त्यामुळे आपल्याला जे दिसतं, ते घरी तसंच दिसेलच असं नाही.

रंगामध्ये थोडा फरक

सर्वात मोठा फरक पडतो तो प्रकाशामुळे. ट्रायल रूममध्ये साधा पांढरा दिवा नसतो. तिथे मऊ आणि उबदार प्रकाश वापरला जातो. हा प्रकाश चेहरा आणि शरीरावर पडणाऱ्या सावल्या कमी करतो. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते आणि कपड्यांचा रंगही उठून दिसतो. अनेकवेळा कपड्याचा मूळ रंग आणि ट्रायल रूममध्ये दिसणारा रंग यामध्ये थोडा फरक जाणवू शकतो. घरी नैसर्गिक प्रकाश किंवा ट्यूबलाइटमध्ये तोच ड्रेस पाहिला की त्याचे खरे स्वरूप समोर येते.

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आरसा. अनेक कपड्यांच्या दुकानांमध्ये खास प्रकारचे आरसे बसवलेले असतात. काही आरसे अगदी हलक्या कोनात लावलेले असतात. त्यामुळे उंची थोडी जास्त आणि शरीर अधिक सडपातळ दिसू शकते. काही ठिकाणी अशा प्रकारचे आरसे वापरले जातात की त्यात व्यक्ती अधिक फिट दिसते. त्यामुळे कपडे अंगावर अधिक चांगले वाटतात आणि खरेदी करण्याची इच्छा वाढते.

मनही प्रसन्न होते…

ट्रायल रूमचे वातावरणही आपल्या निर्णयावर परिणाम करते. आतमध्ये स्वच्छता, थंड हवा, छान सुगंध आणि शांतता असते. बाहेरच्या गर्दीमधून आत गेल्यावर मनही प्रसन्न होते. अशा वेळी आपण स्वतःकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहतो. त्यामुळे साधे कपडेही विशेष वाटू लागतात.

मानसशास्त्र काय म्हणते?

यामध्ये मानसशास्त्राचाही भाग आहे. एखादा नवीन ड्रेस घातल्यानंतर आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. आपण स्वतःची कल्पना त्या कपड्यांमध्ये एखाद्या कार्यक्रमात किंवा खास प्रसंगी करू लागतो. त्यामुळे त्या क्षणी निर्णय भावनेतून घेतला जातो. घरी आल्यावर मात्र शांतपणे विचार केला जातो आणि मग त्याच कपड्याबद्दल मत बदलू शकते.

कपडे खरेदी करताना काय काळजी घ्यावी..

म्हणूनच कपडे खरेदी करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य असेल तर ट्रायल रूममधून बाहेर येऊन दुकानातील वेगळ्या प्रकाशातही ड्रेस पाहा. रंग नैसर्गिक प्रकाशात कसा दिसतो, हे तपासा. घाईत निर्णय घेण्यापेक्षा दोन मिनिटे जास्त विचार केल्यास चुकीची खरेदी टाळता येऊ शकते.

Dengue Vaccine: डेंग्यूविरुद्ध ‘ब्रह्मास्त्र’ तयार! भारतात पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटातील नागरिकांना मिळणार कवच

फॅशन महत्त्वाची असली तरी…

कपडे निवडताना केवळ आरशात दिसणाऱ्या प्रतिमेवर विश्वास ठेवू नका. आरामदायक फिटिंग, रंग, कापड आणि वापराचा उद्देश यांचाही विचार करा. फॅशन महत्त्वाची असली तरी रोजच्या वापरात कपडे किती योग्य वाटतात, हे अधिक महत्त्वाचे असते. पुढच्यावेळी शॉपिंगला गेल्यावर ट्रायल रूममध्ये ड्रेस खूपच परफेक्ट वाटला, तरी लगेच निर्णय घेऊ नका. थोडा वेळ घ्या, वेगळ्या प्रकाशात पाहा आणि मगच खरेदी करा. अशा छोट्या सवयीमुळे नंतर “हा ड्रेस घ्यायलाच नको होता” अशी भावना येण्याची शक्यता खूप कमी होईल.

Web Title: Why clothes look better in trial rooms uncover shopping secrets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी
3

Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला कान्हासाठी बनवा मथुरेचे प्रसिद्ध पेढे! जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
4

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.