सर्वच महिला आणि मुलींना साडी नेसायला खूप आवडते. साडी नेसल्यानंतर महिलांचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. मात्र नेहमी नेहमी त्याचं त्याचं साड्या नेसून कंटाळा आल्यानंतर त्या साड्यांचा वापर करून तुम्ही हटके डिझाइन्सचे ड्रेस शिवून घेऊ शकता. हल्लीकाठापदराच्या सुंदर साड्यांपासून तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सचे ड्रेस बनवून घेऊ शकता. कपाटामध्ये काठपदरासोबतच सिल्क, पैठणी, बनारसी इत्यादी अनेक वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये साड्या असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जुन्या साड्यांचा वापर करून ड्रेस शिवण्यासाठी काही हटके डिझाईन्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
काठापदराच्या जुन्या साड्यांपासून शिवा 'या' पद्धतीचे डिझाईनर ड्रेस

पैठणी किंवा बनारसी साडीपासून तुम्ही या पद्धतीचा स्टयलिश ड्रेस शिवून घेऊ शकता. ब्लेझर आणि पँट अतिशय सुंदर लुक देईल.

साडीपासून शिवलेले अनारकली ड्रेस अतिशय सुंदर दिसतात. त्यावर तुम्ही साडीच्या काठाला मॅच होईल अशी ओढणीसुद्धा शिवून घेऊ शकता.

काठपदरच्या किंवा बनारसी साडीपासून तुम्ही या पद्धतीचे सुंदर वनपीस शिवून घेऊ शकता. हे वनपीस तुम्ही सणावाराच्या दिवशी घालू शकता.

साड्यांचा वापर करून तुम्ही पारंपारीक फ्रॉक, पंजाबी ड्रेस, कुर्ते किंवा दुपट्टे शिवू शकता. यामुळे महागातील साड्या वाया जाणार नाहीत. पैठणी साडीपासून तुम्ही या पद्धतीचा फुल हात असलेला सुंदर अनारकली शिवून घेऊ शकता.

काठापदराच्या किंवा साड्यांचा वापर करून तुम्ही रोजच्या वापरात घालण्यासाठी सुंदर ड्रेस शिवून घेऊ शकता. या पद्धतीचे ड्रेस तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा परिधान करू शकता.






