तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक गोड पदार्थ बनवले जातात. गुलाबजाम, शेवयांची खीर, तांदळाची खीर, बासुंदी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच पदार्थ बनवण्याऐवजी घरी काहींना काही हटके पदार्थ बनवून पाहावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला श्रीखंड वडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरात श्रीखंड पुरी बनवली जाते. श्रीखंड कायमच विकत आणले जाते. दही, साखर आणि सुक्या मेव्याचा वापर करून बनवलेला गोड पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. बाजारात विकत मिळणारे भेसळ युक्त श्रीखंड आणून खाण्यापेक्षा घरी तयार केलेले श्रीखंड खावे.गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर विकत मिळणारे श्रीखंड किंवा इतर कोणतीही मिठाई आणण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया श्रीखंड वडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






