फोटो सौजन्य - Social Media
नकारात्मकता सांगून भासत नाही. कधी आपल्या नक्षत्रांमध्ये ग्रह फिरू शकतात आणि अशा गोष्टी दिसू शकतात, याचे काही भान नाही. जर तुम्हीही अशा गोष्टींना पाहत असाल तर सांभाळून. या गोष्टी जिव्हारी फिरतात. रमशाची आई फार आजारी होती. आईच्या काळजीसाठी ती रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबून होती. हॉस्पिटलच्या आवारात एका जागेवर बसलेली असता तिच्यासोबत असे काही घडले की त्याबद्दल विचार करणे तिच्यासाठी जड जात होते.
रमशा शांत बसलेली होती. तिच्या समोरून एक नर्स येथून तेथून येरझारा घालत होती. रमशाने आधी लक्ष दिले नाही. पण तिच्या लक्षात आले की ही नर्स फक्त समोरून जातेय… पुन्हा येत नाही आहे. तिच्या मनात प्रश्नांचा तुफान येतो. जर ही त्या बाजूला परततच नाही आहे, तर तेथून परत कशी काय येत आहे? रमशा फार खोल विचारात जाते आणि त्या नर्सच्या मागे जाण्याचं ठरवते. पाठलाग करत ती नर्सच्या मागे एका वॉर्डमध्ये पोहचते. आत नर्स सगळ्या रुग्णांचे तोंड धरून खुले करते आणि बंद करते. अशा प्रत्येक रुग्णांसोबत ती करत असते. पण असो, ही काम करतेय म्हणजे नक्की नर्सच आहे. याची खात्री रमशाला बसते. त्यामुळे रमशा पुन्हा बाहेर जाण्यासाठी मार्गस्थ होते. पण जशी ती वळते, समोर तीच नर्स, जी आता आत होती.
रमशा हादरून जाते. ती नर्स रमशावर भडकते. “काय आहे इथे? जा बाहेर बस…” इतकं जोरात म्हणून तावातावात ती नर्स वॉर्डमध्ये जाते. आतमध्ये काळोख पसरला असतो. रमशा धावत येत आईच्या वॉर्डमध्ये जाऊन शांत बसते. सकाळ होताच रमशा पुन्हा त्या ठिकाणी जाते, ज्या वॉर्डमध्ये ती नर्स होती. पण तिथे कोणताही वॉर्ड नसतो. तो एक शवगृह असतो आणि तिथे काम करणाऱ्या जुन्या नर्सेसचेही फोटो तेथे टांगलेले असते. ते पाहत असताना रमशाला “मॅक्डेनिला” असे नाव नमूद असणारे नर्सचे फोटो सापडते. २००६ ला तिचा मृत्यू झाला असतो. आणि हो! ही तीच नर्स जी तिला काल रात्री भेटली होती.
ही घटना वाचकांनी सांगितलेला अनुभव असून या घटनेवर आमचा कोणताही दावा नाही.