पालघरमध्ये रेल्वेच्या इंजिनला आग (फोटो- टीम नवराष्ट्र)
रेल्वे इंजिनला भीषण आग
पालघरमधील घटना
वलसाड एक्स्प्रेसमधील घटना
Railway Engine Fire News: पालघर जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे. पालघर जिल्ह्यात एका रेल्वेच्या इंजिनला भीषण आग लागली आहे. पश्चिम रेल्वेच्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली आहे. पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील केळवे रेल्वेस्थानकाजवळ इजिनला आग लागली आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आठ वाजताच्या सुमारास आग लागली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मुंबवरून गुजरातला जाणाऱ्या वलसाड पॅसेंजरच्या इंजिनला आग लागली आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच रेल्वे केळवे स्थानकावर थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. तसेच पालघर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
रेल्वे इंजिनला आग लागल्यामुळे या मार्गवारील ओव्हरहेड वायर देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक देखील विस्कळीत झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई सेंट्रल स्थानकातून गुजरातला जाणारी ही रेल्वे केळवे स्थानकावर जाताच इंजिनमधून धूर येत असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आले. तातडीने गाडी थांबवण्यात आली. प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले.
सध्या आग लागलेले रेल्वेचे इंजिन गाडीपासून वेगळे करण्यात आले आहे. गुजरातकडे जाणाऱ्या जाही गाड्या वसई, विरार स्थानकावर थांबवणून ठेवण्यात आल्याचे समजते आहे. मात्र या रेल्वेच्या इंजिनला आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. योग्य तपास झाल्यावरच ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकणार आहे.
आंबिवली गावामधील घराला भीषण आग
कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले.घराला आग लागले त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही,मात्र घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे.
Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाचे प्रवेशद्वारावर असलेले जगदीश कराळे यांच्या घराला पहाटे भीषण आग लागली होती.पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही आग लागली आणि त्यावेळी जगदीश कराळे यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती नव्हते. राहत्या घराला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र ही आग विझवण्यासाठी आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.परंतु ही आग इतकी भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तसेच या आगीच्या ज्वालांमध्ये घराचे पत्रे देखील फुटले आहेत.